Home उतर महाराष्ट्र बाभळेश्वर येथे महिला दिन साजरा….

बाभळेश्वर येथे महिला दिन साजरा….

104

आशाताई बच्छाव

IMG_20240319_202700.jpg

बाभळेश्वर येथे महिला दिन साजरा….
श्रीरामपूर , दिपक कदम तालुका प्रतिनिधी – राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे सलेशियन सिस्टर्स ऑफ डाॅन बास्को यांच्या वतीने रविवार दिनांक १७/०३/२०२४ रोजी मारिया भवन बाभळेश्वर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महिला दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अहमदनगर येथील संचालिका ऑक्सीलियम काॅन्हव्हेन्ट स्कूलच्या सर्वेसर्वा सिस्टर रिटा लोबो यांनी स्विकारले त्याप्रसंगी स्त्री कुटुंबाचा प्रकाशाचा दिवा या विषयावर त्यांनी आपले सूदंर असे मनोगत व्यक्त केले.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राहाता येथील जिल्हा परिषद शिक्षिका संगिता लोंढे ह्या होत्या.त्याचबरोबर बाभळेश्वर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.अब्राहम रणनवरे ,उद्योजक, अशोक बॅकेचे संचालक जितेंद्र तोरणे, समाजसेवक, दिपक कदम, अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या जिल्हा अध्यक्ष रमादेवी धिवर, श्रीरामपूर आर.पी.आय.चे शहराध्यक्ष उजवळाताई येवलेकर, राहुरी येथील रमाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष स्नेहल सांगळे व तालुका अध्यक्ष ज्योती ताई पलघडमल इ.प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन अनिता ग्रसिअस व मारिया भवन व स्टाफ यांनी केले होते.तसेच सर्व महिला बचत गट ,बाळ येशू युथ ग्रुप यांचे सदस्य उपस्थित होते.त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाप्रसंगी होती.

Previous articleबेबरा येथील जलजीवन योजनेची चौकशी करण्याची मागणी..
Next articleवकिला विरुद्ध फसवणुकी गुन्हा; बार असोशियनआक्रमक, आयुक्तालयावर धडकले वकील.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.