Home Breaking News आयोगाचा ठरलं; आचार सहित लागू होताच संकेतस्थळावरून राजकीय नेत्यांचे छायाचित्र होणार गायब.

आयोगाचा ठरलं; आचार सहित लागू होताच संकेतस्थळावरून राजकीय नेत्यांचे छायाचित्र होणार गायब.

178

आशाताई बच्छाव

IMG_20240316_170218.jpg

आयोगाचा ठरलं; आचार सहित लागू होताच संकेतस्थळावरून राजकीय नेत्यांचे छायाचित्र होणार गायब.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
लोकसभा निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहिता शनिवारी, १६ मार्च रोजी दुपारनंतर लागू होणार आहे. त्यामुळे मंत्रालय, प्रशासकीय विभागांनी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून राजकीय निर्देश दिले आचारसंहिता प्रत्यक्ष लागू झाल्याच्या दिवशीच ही कार्यवाही तातडीने करावी लागणार आहे. मात्र राज्यात १० हजार बसेस वर शासनाचा उदो उदो, नेत्यांचे छायाचित्र असलेल्या योजनेची जाहिरात कशी हटवणार, हा मोठा गंभीर प्रश्न उद्भवणार आहे. एन मार्च एंडिंग धामधुमीत शासकीय अधिकारी तथा कर्मचारी निवडणूक तिच्या कार्यावर तैनात करण्यात आल्यामुळे लोकशाहीच्या चेहऱ्यावरचे हास्य कमी झाले आहे. सध्या मार्च महिन्यात येणारा निधी कसा आणि कसा खर्च घालावा यात अनेक कार्यालयाचे बाबू फाईल मध्ये तोंड खुपसून बसलेले आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ७ मार्च रोजी पत्र काढून, मंत्रालय, प्रशासकीय विभाग आणि विभागीय तसेच तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या विविध विभागाच्या कार्यालयात नेत्यांच्या तसबीरी, काढण्याचे फर्माने सोडले आहेत. अजून पर्यंत अनेक विभागातील नेत्यांच्या तसबीरी, विकास कामाच्या दूध उद्घाटनाचे नाम फलक झाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झालेले नाही. हे वास्तव आहे सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी ७ मार्च रोजी सर्व विभागांना पत्र देऊन कोणत्याही प्रकारच्या राजकीय नेत्यांची छायाचित्र असल्याचा अशी छायाचित्र त्वरित हटविण्याचे निर्देश दिले आहेत. आचारसंहिता काळात आणि त्यानंतर पूर्ण प्रक्रिया होईस्तोवर तसबीर कार्यालयात लावता येणार नाही, असे दिसून आल्यास अधिकारी घरी जाणार असा दम भरण्यात आलेल्या आहे. तर एसटी महामंडळाच्या बसेस वरील जाहिरात हटवणार कोण असाही प्रश्न निर्माण झालेला आहे? महाराष्ट्र निवडणूक आयोगाने शासकीय कार्यालय, वाहने, यावरच असलेले नेत्यांचे फोटो, सरकारी जाहिरात काढण्याचे आधीच दिलेली असताना महाराष्ट्राची एसटी महामंडळ परिवहन बस मात्र झेरॉक्स पणे राज्याची जाहिरात असलेले फलक घेऊन गाव गावी, शहरात जात असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील सुमारे१०, हजार बसेस वर दोन्ही बाजूला आणि मागील बाजूने मंत्र्यांच्या फोटोसह राज्यातील ४९ विभागाच्या जाती दिसून येत आहे. कोट्यावधी निधी खर्च करून जाहिरात करण्यात आले आहेत. एसटी बसेस वर कल्याण नेत्यांची जाहिरात मात्र आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही काय.

Previous articleशासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातर्फे “बालरक्षा” किटचे वितरण.
Next articleअमरावती जुन्या शहरात पंचशील चौकात घाणीचे साम्राज्य.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.