Home नाशिक ब्राह्मण महासंघाच्या विश्वस्त सौ स्मिताताई कुलकर्णी रणरागिनी पुरस्काराने सन्मानित

ब्राह्मण महासंघाच्या विश्वस्त सौ स्मिताताई कुलकर्णी रणरागिनी पुरस्काराने सन्मानित

118

आशाताई बच्छाव

IMG_20240311_083043.jpg

ब्राह्मण महासंघाच्या विश्वस्त सौ स्मिताताई कुलकर्णी रणरागिनी पुरस्काराने सन्मानित

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील प्रत्येक क्षेत्रातील कर्तृत्व वान महिलांचा रणरागिणी पुरस्काराने सन्मान सोहळा निफाड येथे मा सौ सीमाताई हिरे आमदार नासिक विधानसभा पश्चिम मतदार संघ यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदलालजी चोपडा श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून निफाड मंडल अधिकारी शितलताई कुयटे, निफाड नगराध्यक्षा सौ कविताताई धारराव माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर निकाळे होते. ब्राह्मण महासंघ विश्वस्त तथा भाजपा नाशिक जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा सौ स्मिताताई कुलकर्णी यांना रणरागिणी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. माणुसकी फाउंडेशन महिलांचा सर्वांगीण विकास सामाजिक, अध्यात्मिक ,शैक्षणिक ,आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत सामाजिक, राजकीय, वीट भट्टी मजूर, ऊस तोडी कामगार, अध्यात्मिक, बँकिंग, वैद्यकीय, क्रीडा, अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले सामाजिक क्षेत्रातील कार्य तसेच महिला सक्षमीकरणासह उल्लेखनीय कार्यासाठी सौ स्मिताताई कुलकर्णी, राजकीय क्षेत्र सौ सीमाताई दरेकर पाटील, बँकिंग क्षेत्र सौ मायाताई होळकर ,अंगणवाडी कार्य सौ कविता ताई चव्हाण, वैद्यकीय सेवा परिचारिका सौ सुनीताताई बोडके, सागर कन्या श्रावणी देसाई यांनी देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Previous articleजिल्हा कचेरीवर उपोषण: १४ प्रकल्पग्रस्त आंदोलकांची प्रकृती बिघडली.
Next articleश्री क्षेत्र वनसगावला आज संत वृंदाच्या उपस्थितीत धर्म ध्वजारोहण सोहळा–
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.