Home अमरावती जिल्हा कचेरीवर उपोषण: १४ प्रकल्पग्रस्त आंदोलकांची प्रकृती बिघडली.

जिल्हा कचेरीवर उपोषण: १४ प्रकल्पग्रस्त आंदोलकांची प्रकृती बिघडली.

33
0

आशाताई बच्छाव

IMG_20240311_082729.jpg

जिल्हा कचेरीवर उपोषण: १४ प्रकल्पग्रस्त आंदोलकांची प्रकृती बिघडली.
——–
दैनिक युवा मराठा
पी .एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
प्रलंबित विविध मागण्यासाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे जिल्हा कचेरीवर गुरुवारपासून उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी १४ आंदोलकांना चक्कर व उलटी अशक्तपणा आल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आ. प्रताप अडसूळ व प्रकल्पग्रस्तांची चर्चा झाली. मात्र, रविवारी सायंकाळपर्यंत शासन प्रशासनाकडून कोणताही निर्णय आलेला नाही. त्यामुळे आंदोलन त्रिव करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिला आहे. रविवारी प्रशांत मुरादे, गली बाई चव्हाण, कविता राठोड, कैलास तेलखडे, सूर्यभान कोठे, छाया झोड, विदुष गावंडे, महादेव चक्रनारायण, राणू राठोड, रंजना पाटील, रामरषी सीयाले, राणी तिडके, अनुसया नागले, शोभा दवंडे यांना प्रकल्पग्रस्तांना रुग्णालयात भरती करण्यात आले.६जुन२०६च्या शासनादेशानुसार सरळ खरेदी पद्धतीने खरेदी करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्ताच्या जमिनीला सण २०१३च्या भूसंपादन कायद्यानुसार वाढीव मोबदला मिळाला पाहिजे, पुनर्वसन कायद्यान्वये प्रकल्पग्रस्त कुटुंबाच्या व्यक्तीस सरळ सेवा भरती द्वारे सरकारी नोकरी मिळायला पाहिजे. यासह अनेक मागण्या आंदोलकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here