Home वाशिम आज शनिवारी वाशिम येथे आयुष्यमान भारत कार्ड वाटप व भव्य आरोग्य शिबिर

आज शनिवारी वाशिम येथे आयुष्यमान भारत कार्ड वाटप व भव्य आरोग्य शिबिर

107

आशाताई बच्छाव

IMG_20240309_072125.jpg

आज शनिवारी वाशिम येथे आयुष्यमान भारत कार्ड वाटप व भव्य आरोग्य शिबिर

व्हॉईस ऑफ मीडियाचा पुढाकार : पत्रकारांनी लाभ घेण्याचे आवाहन

वाशीम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- पत्रकार आणि त्यांच्या परिवाराच्या हितासाठी झटणार्‍या व्हॉईस ऑफ मीडिया व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील सर्व पत्रकार बांधवांसाठी येत्या, शनिवार, ९ मार्च रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत आयुष्यमान भारत कार्ड वाटप व भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबीर जिल्हा सामान्य रुग्णालय येथील पहिल्या मजल्यावरील स्किल डेव्हल्पमेंट हॉल येथे घेण्यात येणार आहे. या शिबीरात पत्रकारांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच यावेळी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरात पत्रकारांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी केली जाणार आहे. तरी आरोग्य शिबीर व आयुष्यमान भारत कार्ड वाटप कार्यक्रमाचा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा, तालुका, शहर व सर्व विंगच्या वतीने व्हॉईस ऑफ मीडिया पदाधिकारी यांनी केले आहे.

Previous articleउद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनिमित्त शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात
Next article७ दिवसात आरटीओ कार्यालय सुरु करून दाखवले, अशक्य हा शब्द आमदार मंगेश चव्हाण यांना माहित नाही – ना. गिरीश महाजन..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.