Home उतर महाराष्ट्र शिर्डी मतदार संघात आम्ही केवळ मतदान करण्यासाठीच आहोत का? – राजेंद्र वाघमारे...

शिर्डी मतदार संघात आम्ही केवळ मतदान करण्यासाठीच आहोत का? – राजेंद्र वाघमारे यांचा सवाल

123

आशाताई बच्छाव

IMG_20240302_081253.jpg

शिर्डी मतदार संघात आम्ही केवळ मतदान करण्यासाठीच आहोत का? – राजेंद्र वाघमारे यांचा सवाल

नेवासा -अहमदनगर, दिपक कदम 

राजेंद्र वाघमारे
———————————————————-
नेवासा – शिर्डी लोकसभा मतदार संघ राखीव झाल्यापासून आतापर्यंत थेट एका विशिष्ठ समाजालाच उमेदवारी मिळत असेल तर ? इतर समाजील जनता आणि त्यांचे नेते केवळ लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठीच आहेत काय? असा थेट सवाल उपस्थित करत शिर्डी लोकसभेसाठी इच्छूक असलेले इंदिरा कॉंग्रेसचे उमेदवार राजेंद्र वाघमारे यांनी उपस्थित करुन ज्या समाजाला आतापर्यंत उमेदवारी देण्यात आली तो समाज या मतदार संघात किती टक्के आहे? आणि इतर समाज किती टक्के आहे? याचा सारासार विचार करुन राजकिय पक्षांनी उमेदवारी देतांना मतदारांची संख्या लक्षात घेवूनच उमेदवारी द्यावी आणि केवळ एकच समाजाला उमेदवारी इतर समाजावर अन्याय करु नये अशी थेट मागणी करत या मतदार संघातील जातीय समिकरण आणि आकडेवारी मांडत शिर्डी लोकसभेसाठी इच्छूक असलेले इंदिरा कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार राजेंद्र वाघमारे यांनी प्रस्तृत प्रतिनिधींशी बोलतांना केली.
शिर्डी लोकसभा मतदार संघ राखीव झाल्यापासून आतापर्यंत या मतदार संघात चर्मकार समाजालाच उमेदवारी दिली गेली जात आहे हा समाज या मतदार संघात किती टक्के आहे ? आणि बौद्ध समाज किती टक्के आहे ? याचा विचार न करता हा मतदार संघ राखीव झाल्यापासून एका विशिष्ठ समाजालाच उमेदवारी का दिली जाते ? मग इतर समाजावर हा अन्याय नाही का? आम्ही केवळ मतदानाचे राष्ट्रिय कर्तव्य बजावण्यासाठीच आहोत का? असा स्पष्ट आणि निर्भिड सवाल वाघमारे यांनी उपस्थित करुन आमच्या समाजाला यावेळेस उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणीही यावेळी त्यांनी प्रस्तृत प्रतिनिधींशी बोलतांना वाघमारे यांनी यावेळी केली असून यावेळेस आमच्या समाजाला उमेदवारी मिळाली नाहीतर आमचा समाज वेगळा विचार केल्याशिवाय राहणार नाही ? असे परखड मतही वाघमारे यांनी व्यक्त करुन जातीय समिकरणाचे गणित मांडत खलबत्ते सुरु करुन या मतदार संघात बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी वाघमारे यांनी केली आहे.

Previous articleदेवू तुतारीची ललकारी, घेऊ विजयाची भरारी !
Next articleआरंभ प्रतिष्ठान यांना कार्यगौरव पुरस्कार :मर्चंट असोसिएशन लि.श्रीरामपूर यांच्या वतीने गुरुवर्य प.पू..रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते देण्यात आला.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.