Home बीड टिप्पर ऑटो रिक्षाची समोरासमोर धडक; सहाजण गंभीररित्या जखमी

टिप्पर ऑटो रिक्षाची समोरासमोर धडक; सहाजण गंभीररित्या जखमी

124

आशाताई बच्छाव

IMG_20240228_071104.jpg

टिप्पर ऑटो रिक्षाची समोरासमोर धडक; सहाजण गंभीररित्या जखमी

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/धारुर दि:२७  रोजी भर खाऊ वेगाने निघालेल्या टिप्पर व ऑटो रिक्षा ची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये अपे रिक्षातील सहा जण गंभीरत्या जखमी झाल्याची घटना तेलगाव – धारूर रस्त्यावरील थेटेगव्हाण फाट्याजवळ आज दुपारच्या दरम्यान घडली. जखमींना तात्काळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. धारूर शहरापासून जवळच असलेल्या खामगाव – पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने निघालेले टिप्पर थेटेगव्हाण जवळ येताच समोरून प्रवासी घेऊन दिल्या अपे रिक्षाला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण आहे की, आपे रिक्षाचा अक्षरशा सुरणात झाला असून रिक्षातील प्रवासी सुभाष बडे, हौसाबाई बडे, भागवत घुले, संगीता घोळवे, रामा घोळवे, गवळण तिडके हे सहा जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या महामार्गावर नेहमीच अपघात घडत असून याला अरुंद रस्ता कारणीभूत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परंतु असुरक्षित रस्त्यामुळे बीड जिल्ह्यातील वाढत्या अपघातांनी प्रवासी व वाहन चालकाच्या मनात धडकी भरवली आहे.

Previous articleमराठी भाषा दिन विशेष — कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिवस–
Next articleमराठी भाषा दिनानिमित्त मराठी शिक्षकांचा सत्कार करून मराठी भाषा दिन साजरा! अँड.मनोज संकाये
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.