आशाताई बच्छाव
पाथर्डी,(दिपक कदम प्रतिनिधी)- संत रोहिदास महाराज हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असून गोरगरीब दलित कष्टकरी समाजाला सदमार्ग दाखवण्याचे काम त्यांनी केले असून समाजाला वेगळ्या वाटेने प्रवास करण्याची प्रेरणा त्यांनी दिली आहे. असे मत प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य शाखा पाथर्डी च्या वतीने आयोजित संत रोहिदास महाराज जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल साठे,शहर प्रेस क्लबचे अध्यक्ष उमेश मोरगावकर, राजेंद्र सावंत, प्राचार्य अशोक दौंड, अँड. हरिहर गर्जे, अनिल खाटेर,अमोल कांकरिया, अभिजीत खंडागळे, राजेंद्र देवडे, बंडूसेठ बोरुडे, हुमायून आत्तार, मरकड सर, अशोक गाडेकर, राजेंद्र कोटकर, साळवे साहेब, विक्रम ढेरे, गरकळ सर हे उपस्थित होते. यावेळी भारत गाडेकर यांनी वंदन माणसाला हे स्वागत गीत सादर करून कार्यक्रमास सुरुवात केली.
प्रमुख पाहुणे अविनाश मंत्री बोलताना म्हणाले की, मानवता हा एकच धर्म असून सर्वांनी तो पाळायला हवा. कष्टकरी श्रमिकांसाठी संत रोहिदास महाराज यांचे कार्य उल्लेखनीय असून समाजाला अधोगतीपासून रोखण्याचे काम त्यांनी केले आहे. पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन केल्यानंतर प्रा. डॉ. अशोक कानडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शेवाळे यांनी केले तर शेवटी आभार देवेंद्र आंबेडकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शब्दगंधाच्या पाथर्डी शाखेचे डॉ अनिल पानखडे, उदागे सर, गाडेकर मँडम, कानडे मँडम, संतोष एडके, पिंकी बताडे यांनी परिश्रम घेतले.






