Home भंडारा स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट तांदळाचे वाटप  चौकशीची मागणी

स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट तांदळाचे वाटप  चौकशीची मागणी

223

आशाताई बच्छाव

IMG_20240226_203704.jpg

स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट तांदळाचे वाटप
चौकशीची मागणी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) तुमसर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमार्फत लाभार्थ्यांना सरकारकडून मोफत धान्य दिले जाते. मात्र या धान्यात गेल्या काही महिन्यापासून निकृष्ठ दर्जाचा तांदळाचा नियमित पुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रायुका जिल्हा अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी केली आहे. तुमसर तालुक्यात 163 स्वस्त धान्य दुकाने दुकाने कार्यरत आहेत. तालुक्यात अंत्योदय योजनेचे 14 हजार 90 कार्ड तर प्राधान्य योजनेचे 31 हजार 792 लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थांना सरकारकडून मोफत धान्याचे वाटप केले जाते.यामध्ये तांदूळ व गव्हाचा पुरवठा केला जातो.
मात्र असे असतानाच गेल्या अनेक महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानात निकृष्ठ दर्जाचा तांदळाचा पुरवठा सरकारकडून केला जात आहे. मात्र हा दिला जाणारा तांदूळ निकृष्ठ दर्जाचा दिला गेला आहे. तांदळामध्ये अर्धा तुकडा मोठ्या प्रमाणात असून असा अड्या लागलेल्या तांदूळ गोरगरीब नागरिकांना दिला जात असल्याने त्यांनी प्रशासन व शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात रायुका जिल्हा अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला आहे.

सरकार मोफत धान्य वाटप करीत असल्याचा धिंडोरा पिटत असून आदिवासी व गोरगरीब जनतेला असा निकृष्ठ दर्जाचा तांदूळ वाटप करून त्यांच्या आरोग्याशी खेळत होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी .
ठाकचंद मुंगूसमारे
रायुका जिल्हा अध्यक्ष

Previous articleसंकेत भोसले( भिवंडी) मारहाण हत्या प्रकरणी दोषी व्यक्तींना फाशीची शिक्षा द्या – भीम आर्मी
Next articleपात्र असूनही घरकुल योजनेपासून डावलल्याने पंचायत समिती समोर बेमुदत संप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.