Home मुंबई युवा संसद खासदार ठाणे जिल्हा आणि स्वराज्य पोलीस मित्र संघटना कल्याणचे सचिव...

युवा संसद खासदार ठाणे जिल्हा आणि स्वराज्य पोलीस मित्र संघटना कल्याणचे सचिव आकाश मेंगजी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

59
0

आशाताई बच्छाव

IMG_20240224_193004.jpg

युवा संसद खासदार ठाणे जिल्हा आणि स्वराज्य पोलीस मित्र संघटना कल्याणचे सचिव आकाश मेंगजी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर
युवा मराठा न्यूज
सविता तावरे-मुंबई स्पेशल रीपोर्टर
काल 23 फेब्रुवारी 2024 रोजी स्वराज्य पोलीस मित्र संघटनेचे कल्याण शहर सचिव आणि संसद युवा खासदार नम्रसेवक आकाश मेंगजी यांनी वाढदिवसानिमित्त समाज मंदिर, उल्हासनगर१ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मोठ्या संख्येने लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. ब्लड प्रेशर, शुगर, हृदयाची ईसीजी तपासणी, ठराविक औषधे मोफत, डोळे तपासणी व अल्प दरात चष्मे वाटप, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, स्त्रियांचे विविध आजार व तज्ञांचा सल्ला अशी या शिबिरातील वैशिष्ट्ये होती. या शिबिरात स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना मुंबई प्रभारी मालतेश हेब्बारे सर, मुंबई उपाध्यक्ष सुरेश रेवणकर सर, ईशान्य मुंबई अध्यक्ष वाघमारे सर व ईशान्य मुंबई सचिव आनंद वैराळ तसेच गायक सदा लाडके, समाजसेवक आनंद निकम आणि प्रकाश सिधवानी, उज्ज्वला पवार आणि कुणाल पवार व अनेकजण उपस्थित होते. आणि आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील सर यांनी शिबिरात सर्वोतोपरी मदत केली आहे आणि सिद्धिविनायक रुग्णालय कल्याणचे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांनीही उपस्थित राहून पुर्ण सहकार्य केले. या शिबिरात 200 ते 250 लोकांनी उपस्थित राहून या मोफत शिबिराचा लाभ घेतला आणि स्वराज्य पोलीस मित्र संघटना पदाधिकाऱ्यांनी स्वराज्य संघटनेची माहिती दिली. गायक सदा लाडके यांनी सुंदर सुरात गाणे गायले. वाढदिवसानिमित्त नम्र युवासेवक आकाश मेंगजी यांना शुभेच्छा, पुष्पगुच्छ, शाल व आशीर्वाद देऊन केक कापून वाढदिवस साजरा करण्यातआला. भोजना सह कार्यक्रम संपन्न झाला.

Previous articleटोम्पे महाविद्यालयात कमलाबाई जहागीरदार राज्यस्तरीय स्मृती परिसंवाद
Next articleबोधकथा….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here