Home सामाजिक बोधकथा….

बोधकथा….

35
0

आशाताई बच्छाव

IMG_20240224_081242.jpg

बोधकथा….
थंडीचे दिवस सुरु असतात. रात्रीच्या कडक थंडीमध्ये मातीचे चार मटके आपआपसात बोलत असतात.चार ही मटके खूप दुःखी असतात कारण मागच्या तीन चार महिन्यापासुन त्यांना कोणीच खरेदी केलेलं नसते…त्यांच्या सोबत असलेलं इतर मातीचे भांडे  लोकं खरेदी करतात परंतु या चौघांना कोणीच खरेदी करत नव्हते.आपल्याला कोणीच विकत घेत नाही म्हणून ते चौघेही जण खूप दुःखी होतात. आपण कोणत्याच कामाचे नाही. आपण बिनकामाचे आहोत असं स्वतःला समजतात. आणि आप-आपल्या इच्छा एकमेकांना सांगत असतात… पहिलं मटक म्हणतो, मित्रांनो, माझं नशीब खूप खराब आहे. मला दिवा बनायचं होतं, दिवा बनुन लोकांना रोशनी द्यायची होती परंतु कुंभाराने मला मटक बनवल… दुसरं मटक म्हणतो मित्रा माझं नशीब पण चांगल नाही..मला पण खूप दुःख होऊन राहीले कारण मला पैसे खूप आवडतात.पैसे आवडतात म्हणून मला गल्ला बनायचं होतं… गल्ला बनलो असतो तर लोकांनी, लहान मुलांनी माझ्याजवळ पैसे जमा केले असते…तिसरं मटक पण आपलं दुःख व्यक्त करतो. तिसरं मटक म्हणतो मित्रांनो मला छान देवाची मुर्ति बनायची होती… मुर्ति बनलो असतो तर, मला एका श्रीमंत माणसाने विकत घेतले असते… आणि आज मी देवाच्या मंदिरात आराम करत असतो… चौथे मटक तिघांच्या गोष्टी ऐकून हसत असतो… चौथे मटक हसतो हे पाहून इतर मटके त्या चौथ्या मटक्याला विचारतात…काय रे बा…तुला काही दुःख वैगरे नाही आहे का?? तु तर खूप आनंदी दिसतोस…हे ऐकून चौथ मटक म्हणतो, मित्रांनो दुःख तर मला पण आहे…मला खेळणं बनायचं होतं आणि लहान मुलांसोबत खेळायचं होतं… परंतु कुंभाराने मला मटक बनवले… परंतु काही हरकत नाही… आपण एका गोष्टीमध्ये अपयशी झालो म्हणून काय झाले आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये लोकांच्या कामी तर येऊच ना… एक संधी गेली म्हणून काय झालं… संयम ठेवा दुसरी संधी आपल्याला नक्की मिळेल…
ही गोष्ट ऐकून इतर तीनही मटक्याना खूप आनंद होतो…
ते सर्वजण आपआपलं दुःख विसरून पुढच्या संधीची वाट पाहत असतात. काही दिवसानंतर उन्हाळ्याचे दिवस सुरु होतात. लोकांना थंड पाण्यासाठी मटके पाहिजे असतात… तेंव्हा गावातील लोकं कुंभाराकडे जातात आणि अधिक पैसे देऊन ते सर्व मटके विकत घेतात. आता,चौघेही मटके आनंदी असतात कारण ते लोकांची सेवा करण्यात व्यस्त असतात.लोकांना पिण्यासाठी थंड पाणी देतात… या छोट्याशा सुंदर गोष्टी मधून तुम्ही काय शिकले आहात…?? जगात असे लाखो लोकं आहेत, ज्यांना लहानपणी काही तरी वेगळं बनायचं होतं, परंतु ते लोकं बनू शकले नाही… यामुळे हे लोकं स्वतःला अपयशी समजतात. स्वतःला आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत राहतात.काही लोकं असे असतात, जे स्वतःच्या जीवनाचे ध्येय ठरवतात. प्लॅन बनवतात आणि मेहनत सुद्धा करतात तरीपण ते अपयशी होतात… अपयशी झाल्यावर हे लोकं स्वतःला दोष देतात, एवढंच नाही तर इतर लोकांना सुद्धा दोष देत राहतात… परत काही तरी नवीन करण्याचा ते प्रयत्न सुद्धा करत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जर एखाद्या गोष्टीमध्ये अपयशी झाले असाल तर याचा अर्थ असा नाही की, तुम्ही परत कधीच यशस्वी होऊ शकत नाही…मित्रांनो, एक संधी गेली तर जाऊद्या, दुसऱ्या संधीची वाट पाहा….फक्त वाट पाहु नका तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत रहा… तुम्हांला दुसरी संधी मिळेल म्हणजे मिळेलच… जेंव्हा तुम्हाला दुसरी संधी मिळेल तेंव्हा त्या संधीचं सोनं करायला विसरू नका…दुसरी संधी मिळेपर्यंत स्वतःला  इम्प्रोव्हमेन्ट करत रहा…तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये अपयश आले असेल किंवा कॉलेज पूर्ण करुन, वेगवेगळ्या कंपन्या मध्ये इंटरव्हिव्ह देऊन पण तुम्हाला चांगला जॉब मिळत नसेल,तर  जास्त घाबरून जाऊ नका… थोडासा संयम ठेवा… खराब वेळ जाऊद्या… एकदा वेळ बदली की तुम्हाला तुमच्या आवडी प्रमाणे नक्की जॉब मिळेल… संयम ठेवल्याने परिणाम लवकर मिळतात… स्वतःवर विश्वास ठेवा, थोडासा संयम बाळगा… आणि इमानदारीने रोज मेहनत करत रहा… तुम्ही तुमचे सर्व स्वप्न नक्की पूर्ण कराल….!

Previous articleयुवा संसद खासदार ठाणे जिल्हा आणि स्वराज्य पोलीस मित्र संघटना कल्याणचे सचिव आकाश मेंगजी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Next articleचिंता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here