Home उतर महाराष्ट्र भेंडा मुळा कारखान्याबाबत साखर आयुक्तांना निवेदन

भेंडा मुळा कारखान्याबाबत साखर आयुक्तांना निवेदन

81

आशाताई बच्छाव

IMG_20240222_201725.jpg

श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)-नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर साखर कारखाना, भेंडा व मुळा साखर कारखाना, सोनई यांच्याकडून उस उत्पादक शेतकरी व कारखाना कामगार यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत साखर आयुक्तांना निवेदन देऊन

• उसउत्पादक शेतकऱ्यांचा उस गाळपाला येत असतानी, त्याचे पेमेंट पंधरा दिवसामध्ये करणे शासनाच्या नियमाप्रमाणे बंधन कारक असताना कारखान्याकडून तीन महिने उलटून गेली तरीही शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट मिळत नाही.

• कारखान्याचा उस तोडणी प्रोग्राम हा लेबर अभावी पूर्णपणे विसकळीत झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाच्या खोडक्या होत आहेत.

• शेतकऱ्यांना उस तोडणीसाठी एकरी ५००० रुपये द्यावे लागत आहेत.

• मुळा कारखान्याकडून कामगारांचा पगार १० महिन्यापासून व ज्ञानेश्वर कारखान्यामधील कामगारांचे ५ महिन्यापासून त्यांच्या कामाचा पगार दिला गेलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावरती आर्थिक संकट ओढावले आहे.

• मागील वर्षी दोनही कारखान्याची आर्थिक स्थिती चांगली असतानी अचानक या वर्षी कामगारांचे पगार न होने, शेतकऱ्यांना हि त्यांना उसाचे पेमेंट न मिळणे हे एक संशयास्पद आहे.

• आपण कारखान्यांना उस उत्पादक शेतकरी व कारखान्याचे पगार नियमित करण्या बाबत आदेश करावेत. जर याबाबत कारखान्याने वेळेत पेमेंट न केल्यास शेतकरी उपोषण करण्यात येईल असे निवेदनाद्वारे साखर आयुक्तांना सांगण्यात आले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे किसन मोर्चा जिल्हा अध्यक्ष अंकुशराव काळे, प्रसिद्धी प्रमुख रितेश भंडारी, मा.सरपंच अशोकराव टेमक, भाऊसाहेब पवार, संतोष पोटे उपस्थित होते.

Previous articleसाकोली तालुक्यातील सातलवाडा येथे विदर्भस्तरीय दोन दिवशी कलाकार मेळावा संपन्न
Next articleमराठी साहित्याची आवड आपण मुलामध्ये निर्माण करायला हवी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.