Home जालना लक्षवेधी महारक्तदान शिबिराने  जालन्यात शिवरायांना अभिवादन

लक्षवेधी महारक्तदान शिबिराने  जालन्यात शिवरायांना अभिवादन

103

आशाताई बच्छाव

IMG_20240221_083445.jpg

लक्षवेधी महारक्तदान शिबिराने
जालन्यात शिवरायांना अभिवादन
आयोजक सामाजिक कार्यकर्ता शेख इब्राहिम ठरला खरा मावळा
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)– सामाजिक कार्यकर्ते शेख इब्राहिम यांनी  शिवजयंतीनिमित्ताने सोमवारी लक्षवेधी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करून शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा अर्पित केला.
शेख इब्राहिम हे गेल्या 15 वर्षापासून शिवजयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरातील अंबड रोडवरील मंमादेवी नगर परिसरात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक उपक्रम राबवीत आहेत. मराठा क्रांती मोर्चा प्रणित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व शेख इब्राहिम मित्र मंडळाच्या वतीने सोमवारी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
प्रारंभी शिवरायांच्या अर्धकृती पुतळ्यास पुप्षमाला अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. या महा रक्तदान शिबिरात सर्व जाती- धर्माच्या तरूणांनी रक्तदान केले. शेख इब्राहिम यांनी महा रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मराठा सेवा संघाचे आर. आर. खडके, भास्कर अंबेकर, जालना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद,मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील, अक्षय गोरंट्याल आदींनी अभिनंदन करून कौतुक केले. नूर हाॅस्पिटलच्या रक्तपेढीतील डॉ. राहिला शेख, डॉ. बुशरा,खुशमिदा शेख, करामखान,अलिम शेख आदींनी या रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले. शेख महेमूद यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलतांना शेख इब्राहिम म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य स्थापन करून सर्व समाज घटकांना सोबत घेऊन राज्य केले होते. विशेष करून त्यांच्या सैन्य दलात मुस्लिम मावळ्यांना जबाबदारीची पदे देउन त्यांच्यावर मोठा विश्वास दाखविला होत

Previous articleबचत गटाच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणेसाठी सर्व प्रकारे मदत करू –
Next articleजालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती  शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.