Home अमरावती मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रक मध्ये भीषण धडक, क्रिकेट खेळायला निघालेल्या...

मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रक मध्ये भीषण धडक, क्रिकेट खेळायला निघालेल्या ४ चार तरुणाचा मृत्यू तर १० जण गंभीर जखमी.

120

आशाताई बच्छाव

IMG_20240219_050228.jpg

मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रक मध्ये भीषण धडक, क्रिकेट खेळायला निघालेल्या ४ चार तरुणाचा मृत्यू तर १० जण गंभीर जखमी.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती येथून खाजगी बसचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. सिमेंट काँक्रीट मिक्सर आणि मिनी बस चा नांदगाव खंडेश्वर जवळील शिंगणापूर येथे अपघात घडला. या अपघात मध्ये ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा जणांचा जखमी मध्ये समावेश आहे. शिंगणापूर जवळ सकाळी ७.३० ला हा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमरावती येथून खेळाडू हे यवतमाळ येथील सुरू असलेल्या एका स्पर्धेसाठी ट्रॅव्हल्स ने निघाले होते. नांदगाव खंडेश्वर मार्ग यवतमाळला जात असताना शिंगणापूर जवळ समोर येणाऱ्या काँक्रिटी मिक्सर ट्रकने पिवळा रंगाच्या ट्रॅव्हल्सला समोरासमोर जवळ समोरून येणाऱ्या भर वेगात दोन्ही वाहनात टक्कर झाली. प्राथमिक माहितीच्या आधारे या अपघातात स्पॉटवरच४ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर दहा जण जखमी झाले या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अपघात ची माहिती नांदगाव खंडेश्वर पोलिसांना मिळताच विलंबन करता मदती करता अपघात घटनास्थळी पोहोचले. अपघातातील जखमी नागरिकांना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार यासाठी दाखल केले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालय रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार करिता दाखल केले. काही गंभीर जखमींना अमरावती येथे शासकीय रुग्णालयात उपचार करता दाखल केले स्पर्धेला खेळाडू पोहोचण्यापूर्वी चार जण बळी गेले. अमरावती जिल्ह्यातून हे खेळाडू स्पर्धेसाठी यवतमाळ जिल्ह्यात निघाले होते. मात्र स्पर्धेपूर्वीच खेळाडू व काळाने घाला घातला. अपघात झालेल्या घटनास्थळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच अपघातानंतर बराच वेळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघातात झालेल्यांचे नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केलेली आहे. अपघात स्थळी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन पोलीस चमु चौकशी करीत आहेत.

Previous articleदोन दुचाकी गाड्यांची समोरासमोर धडक; एक जण जागीच ठार
Next articleशेतकरी कन्येच्या लग्नासाठी घरपोच आली एक क्विंटल साखर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.