Home नांदेड कालकथीत दत्ता सोनकांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना कॉ.गोविंद पानसरे लिखीत राजर्षी...

कालकथीत दत्ता सोनकांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना कॉ.गोविंद पानसरे लिखीत राजर्षी शाहू महाराज वसा व वारसा ह्या पुस्तकांचे वितरण.

232

आशाताई बच्छाव

IMG_20240218_075959.jpg

कालकथीत दत्ता सोनकांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना कॉ.गोविंद पानसरे लिखीत राजर्षी शाहू महाराज वसा व वारसा ह्या पुस्तकांचे वितरण.
बघता बघता वर्ष झाले बाबा तुम्हा जावून,आम्ही रडतो फोटो ला पाहून,या गीताने उपस्थितांना केले भावनीक तर जेंव्हा भीमा तू जन्मास आला, उद्धारीले तूच आम्हाला,वंदितो बा भीमा मी तुला या गीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

नांदेड/ मनोज बिरादार विभागीय संपादक 

मुखेड तालुक्यातील मौजे बेटमोगरा येथील आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य,शांत,संयमी व स्वाभिमानी विचारसरणीचे खंबीर नेतृत्व म्हणून परिचित कालकथीत दत्ता गंगाराम सोनकांबळे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिवस दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी मौजे बेटमोगरा ता.मुखेड जि.नांदेड येथे त्यांच्या विचारांना अभिप्रेत असलेल्या विविध सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन त्यांच्या सुपुत्रां च्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रमाच्या सुरुवातीस सकाळी ११:३० वा.विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय संविधानाचे निर्माते,विश्वरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांसह कालकथीत (दिवंगत) दत्ता गंगाराम सोनकांबळे यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.तद्नंतर भा.बौ.म.मुखेड च्या वतीने त्रिशरण,पंचशील विधी संपन्न.दुपारी २:०० वा.स्नेहभोजन तर सायंकाळी ठिक ४:०० वा.व्याख्यान व
शालेय विद्यार्थ्याना कॉ.गोविंद पानसरे लिखीत आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा वसा आणि वारसा ही पुस्तके वितरण सोहळा पडला असून त्याचबरोबर वडिलांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी समाज प्रबोधन व आदरांजली पर “भीम गर्जना”गायन पार्टी “मौजे सगरोळी”द्वारा प्रस्तुत बुद्ध भीम गीतांची स्वरांजली चा सांस्कृतिक कार्यक्रम रात्रीला पार पडला.या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक साहेबराव फुगारे यांनी गायलेल्या
बघता बघता वर्ष झाले बाबा तुम्हा जावून,आम्ही रडतो फोटो ला पाहून,या गीताने उपस्थितांना भावनीक केले तर जेंव्हा भीमा तू जन्मास आला,उद्धारीले तूच आम्हाला,वंदितो बा भीमा मी तुला या गीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाला त्यांचे
नातेवाईक,मिञ परिवरातील मंडळीसह रिपब्लीकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे, रि.प.सेना बिलोली ता.महासचिव कपिल भेदेकर,भा.बौ.म.मुखेड ता.अध्यक्ष गंगाधर सोंडारे बावलगावकर,भा.बौ.म.मुखेड ता.संस्कार सचिव डॉ.राहुल कांबळे,गंगाधर कांबळे मावलीकर,बाबूराव कांबळे मावलीकर,
पत्रकार मुस्तफा पिंजारी,कपिल वाघमारे, बळीराम ढवळे, माधव सूर्यवंशी,संपती बनसोडे,सुरेश सोनकांबळे,चांदू कांबळे,ज्ञानेश्वर सोनकांबळे, प्रकाश सोनकांबळे,गौतम सोनकांबळे,भगवान सोनकांबळे,भारत सोनकांबळे सह उपसिका सागरबाई दत्ता सोनकांबळे,महादाबाई चांदू कांबळे, जयश्री सोनकांबळे,भाग्यश्री सोनकांबळे,महानंदा सोनकांबळे, चतुरा सोनकांबळे,श्वेता सोनकांबळे इत्यादिंची कार्यक्रमाला उपस्थीत होती.या कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार भारत सोनकांबळे हे होते.
कालकथीत दत्ता गंगाराम सोनकांबळे हे स्वाभिमान भारत न्युज चे संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हाकार्याध्यक्ष निर्भीड पत्रकार भारत सोनकांबळे यांचे ते वडील होत.दिवंगत दत्ता गंगाराम सोनकांबळे यांचे दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई येथील के.ई.एम.रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.आई वडिलांचे संस्कार शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देत असतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बेटमोगरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा निर्भीड पत्रकार भारत सोनकांबळे यांचे नाव बेटमोगरा परिसरासह मुखेड तालुक्यात अग्रक्रमाने घेता येईल. दिवंगत दत्ता सोनकांबळे यांच्या मुलांनी अतिशय कष्टातून आपल्या जीवनाचे मार्गक्रमण केले असून वडिलांचा मोठा प्रभाव त्यांच्या वागण्या बोलण्यावर असल्याने वडीलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मूलमंत्र (पुस्तके)वाचाल तर वाचाल ही उद्दात भावना मनामध्ये रुजवत शालेय विद्यार्थ्याना पुस्तके वितरणाचा सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांची संकल्पना दिवंगत दत्ता सोनकांबळे यांच्या मुलांनी आखली असल्याने त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक ह्या संकल्पनेचे सर्वच स्तरातून अभिनंदनासह कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

Previous articleपंचायत समिती कृषी विभागामार्फत शेतकरी मेळाव्याचे आयोजन
Next articleसीसीटीव्हीवर यापूर्वी खर्च केलेले कोट्यावधी रुपये गेले पाण्यात; आता पुन्हा साडेदहा कोटींचा निधी मंजूर!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.