Home जालना अंबड तालुक्यात गाव चलो अभियानाचा प्रारंभ  केंद्र सरकारच्या योजनाची घरोघरी जाऊन जनजागृती

अंबड तालुक्यात गाव चलो अभियानाचा प्रारंभ  केंद्र सरकारच्या योजनाची घरोघरी जाऊन जनजागृती

116

आशाताई बच्छाव

IMG_20240218_074538.jpg

अंबड तालुक्यात गाव चलो अभियानाचा प्रारंभ
केंद्र सरकारच्या योजनाची घरोघरी जाऊन जनजागृती
———–
अंबड / जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ):  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने विविध घटकांसाठी  सुरु केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी घनसावंगी विधानसभा मतदारसंघात गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे.भाजपाचे  जिल्हा सरचिटणीस परमेश्वर माने व समृद्धी शुगर्सच्या संचालिका वैशाली सतीश घाटगे  यांच्या उपस्थितीत अंबड तालुक्यातील धाकलगाव सर्कलमध्ये शनिवारी या अभियानास सुरुवात झाली.

भाजापा नेते सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती गाव चलो अभियानातून  घराघरापर्यंत पोहचविण्यात येत आहे.  भाजपाचे  जिल्हा सरचिटणीस परमेश्वर माने यांच्या उपस्थितीत अंबड तालुक्यातील नवीन पिठोरी सिररसगाव येथे विश्वंभर गाडेकर, जगन्नाथ काकडे, गोरख गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर, भाऊसाहेब खेडकर ,अनिरुद्ध कोळेकर, दीपक कोळेकर ,भागवत गाडेकर यांनी घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती असलेले पत्रक वाटप केले. तसेच नागरिकांमध्ये या योजना विषयी माहिती दिली. तर समृद्धी कारखान्याच्या संचालिका वैशाली सतीश घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बारसवाडा गावात हे अभियान राबविण्यात आले. वैशाली घाटगे यांनी महिलांसाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजना व घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.  या अभियानामुळे मोदी सरकारच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहचत आहे.  गावकऱ्यांनी या अभियानाचे स्वागत केले तसेच  भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्याचे आभार मानले.

Previous articleशिव आहेत म्हणून आपण आहोत-साक्षीताई मुळे आज पद्मीनीताई खराडे कीर्तन
Next articleगुरू रविदास परिवर्तन व्याख्यानमाला समिती जाहिर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.