Home नाशिक अशोक गलांडे एम ए पदव्युत्तर परीक्षेत चांदवड महाविद्यालयात प्रथम

अशोक गलांडे एम ए पदव्युत्तर परीक्षेत चांदवड महाविद्यालयात प्रथम

245

आशाताई बच्छाव

IMG_20240208_082540.jpg

अशोक गलांडे एम ए पदव्युत्तर परीक्षेत चांदवड महाविद्यालयात प्रथम

चित्रपट अभिनेते अनिल जी नलावडे यांच्या शुभहस्ते ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरव

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव तालुका निफाड विद्यालयाचे जेष्ठ व इतिहास विषय तज्ञ शिक्षक गलांडे अशोक पुंडलिक यांनी एम. ए.इतिहास या पदव्युत्तर पदवी परिक्षेत ८२:८१% गुण मिळून एस. एन.जे. बी.चांदवड महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळाल्याबद्दल वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात कोटमगाव तालुका निफाड येथील माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ व आदर्श शिक्षक अशोक गलांडे सर यांचा प्रसिद्ध सिनेकलाकर ,नाट्यकलाकर वेगवेगळ्या मालिकेत आपल्या भूमिकेने प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावणारे (तानी चित्रपटात, व श्वास चित्रपट व माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील अभिनेते अनीलजी नलावडे यांच्या शुभहस्ते ट्रॉफी व प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला आहे अशी माहिती कोटमगाव विद्यालयाचे सहकारी शिक्षक मगन केदारे यांनी दिली आहे.
चांदवड येथील एस एन जे बी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कला ,क्रीडा व गुणवत्ता प्रदान विद्यार्थी व प्राध्यापकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव विद्यालयाचे जेष्ठ व इतिहास विषय तज्ञ शिक्षक गलांडे अशोक पुंडलिक यांनी एम. ए.इतिहास ही पोस्ट ग्रॅज्युएट पदवी८२:८१% गुण मिळून प्राप्त केली. व महाविद्यालयात इतिहास,मराठी,राज्यशास्त्र,इंग्रजी ह्या सर्व विषयात पदवीत्तर पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला. अशोक गलांडे सर हे इतिहास विषयाचे गेल्या सतरा वर्षापासून मॉडरेटर म्हणून काम बघतात.इतिहास विषयाचे ते तज्ञ अभ्यासक आहे. गेल्या २५वर्षापासून विविध कार्यक्रमांचे ते सूत्रसंचालन करत आहे..त्यांच्या ह्या यशाबद्दल प्राचार्य शिंपी सर, प्रा पाटील सर, सुनील पगार सर वनसगाव विद्यालयाचे प्राचार्य सी डी रोटे, पर्यवेक्षक के बी दरेकर, विंचूर विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवडे, टाकळी विंचूर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुखदेव लभडे, जिजामाता कन्या विद्यालयाचे समीर देवढे, वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष रामभाऊ आवारे सर, लासलगाव स्विमिंग ग्रुपच्या वतीने अध्यक्ष डॉ.अनिल बोराडे , सुनील ठोंबरे, राजू राणा,पत्रकार निलेश देसाई अरूण खांगाळ ,नाना भवर व सर्व सभासद बंधूंच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.तसेच माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता माणिक मढवई मॅडम, संस्थेचे अध्यक्ष अमोल मढवई सर,चेअरमन प्रतीक मढवई सर तसेच विद्यालयातील शिक्षक मगन केदारे सर, गांगुर्डे सर, दिवटे सर, कदम सर, देवढे सर यांनी अभिनंदन केले.

Previous articleमोबाईल उपयोगी पण….
Next articleतुमसर तालुका न्यायालयातील वकिलांचे ‘पेन डाऊन’ आंदोलन…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.