Home मुंबई वृत्तपत्र विक्रेत्याला मिळाली डॉक्टरेट मिळाली

वृत्तपत्र विक्रेत्याला मिळाली डॉक्टरेट मिळाली

129

आशाताई बच्छाव

IMG_20240201_164539.jpg

वृत्तपत्र विक्रेत्याला मिळाली डॉक्टरेट मिळाली

मुंबई : ( विजय पवार युवा मराठा न्यूज )
अंधेरी येथील हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेन्टलमध्ये २४ जानेवारी रोजी एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट आयोजित ११ वा भारत निर्माण योगदान अवॉर्ड २०२४’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोअर परळ विभागातील वृत्तपत्र विक्रेते डॉ. नीलेश मानकर यांना सामाजिक क्षेत्रातील केलेल्या कार्याबद्दल ‘सोशल वर्कर’ ही पदवी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी लोअर परळ वृत्तपत्र विक्रेत्या संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी अमेरिकन युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि चेअरमन मधु किशन यांना आमंत्रित केले होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी भारताच्या कोनाकोपऱ्यातून विविध मान्यवर उपस्थित होते. मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. घनश्याम कोळंबे यांनी सर्वांचे आभार मानले.

Previous articleठाणेदार धनंजय पाटील यांची पत्रकार संजीव भांबोरे व पत्रकार सय्यद जाफरी यांनी घेतली सदिच्छा भेट
Next articleजनता विद्यालय नांदुर्डी महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.