Home नाशिक चित्रकार प्रदीप भाऊसाहेब शिंदे यांना कला गौरव पुरस्कार प्रदान

चित्रकार प्रदीप भाऊसाहेब शिंदे यांना कला गौरव पुरस्कार प्रदान

144

आशाताई बच्छाव

IMG_20240128_080106.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
चित्रकार प्रदीप भाऊसाहेब शिंदे यांना कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. रघुकुल शैक्षणिक ट्रस्ट डोंबिवली यांच्या राज्यस्तरीय विविध कला स्पर्धा परीक्षा मध्ये कला गौरव पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो यामध्ये नाशिक येथील वडगाव पिंगळा गावचे सुपुत्र प्रदीप भाऊसाहेब शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
तसेच त्यांच्या विद्यार्थिनी समीक्षा शिरोळे (नाशिक जिल्ह्यात प्रथम), वेदिका शिंदे (नाशिक जिल्ह्यात द्वितीय) कार्तिकी गायधनी (शालेयस्तर प्रथम) क्रमांक मिळवत कलाश्री व कलादर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला
हे पुरस्कार जिल्हा परिषद शाळा वडगाव पिंगळा या शालेय स्तरावर गावचे पो.पाटिल सागर मुठाळ, शिवजयंती उत्सव समिती सोहळा अध्यक्ष धिरज मुठाळ, निखिल मुठाळ, दत्तू शिंदे, सुभाष मुठाळ, प्रताप गायधनी, सुभाष मुठाळ, सोनवणे सर, सौ.बन्नापुरे मॅडम यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
तसेच सामाजिक कार्यकर्ते अजय हुल्लुळे, समाधान नागरे, दत्तात्रय मुठाळ, सुरेश सानप, खंडेराव विंचू, सुनिल मुठाळ, शा.समिती अध्यक्ष शरद मुठाळ,मदन गीते, योगेश हरळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.