Home जालना आदीवासी कोळी समाजाचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी महाआंदोलन

आदीवासी कोळी समाजाचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी महाआंदोलन

101

आशाताई बच्छाव

IMG_20240127_061935.jpg

आदीवासी कोळी समाजाचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी महाआंदोलन
आ. कैलास गोरंट्याल यांची आंदोलनस्थळी भेट; सकारात्मक तोडगा काढण्याचे दिले आश्‍वासन
जालना । प्रतिनिधी दिलीप बोंडे- आदिवासी कोळी जमातीच्या अस्तित्वासाठी आणि संविधानिक हक्कांसाठी राज्यव्यापी महाआंदोलन मंगळवार, (दि 23) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केले आहे. या आंदोलनास आ. कैलास गोरंट्याल यांनी गुरुवार (दि 25) भेट दिली. तसेच पालकमंत्री अतुल सावे यांच्याशी भेट घालून देण्याचे आश्‍वासन देतांना मागण्यांसंदर्भात सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.
आदीवासी कोळी समाजाच्यावतीने कोळी, हिंदु कोळी वा तत्सम कोळी नोंदी असल्या तरी अर्जदार कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी यापैकीच एखाद्या जमातीचा असल्यामुळे तो ज्या जमातीचा दावा करत असले त्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, नियम 2003 नुसार 1950 पुर्वीचा रहिवासाच्या पुराव्याव्यतिरिक्त  अनुसूचित जमातींची नोंद असल्याबाबतचा वा रक्तनात्यातील वैधतेबाबतचा पुरावा मागू नये, 7 मार्च 1996चा शासन निर्णय व नियम 2003 नुसार अर्जदारास नियमबाध्य नोंदी कागदपत्रे, दस्तऐवज, पुरावे आदी मागू नये, सर्व प्रलंबित अर्जाचा सकारात्मक विचार करुन आठ दिवसात महा राजस्व अभियानंतर्गत प्रमाणपत्रे देण्यात यावीत, मा. कै. दाजीबा पाटील समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठवावा, बेकायदेशीर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या बरखास्त करून कायद्यानुसार प्रमाणपत्र तपासणीचे काम मा. विभागीय आयुक्त (महसुल) यांच्याकडे देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे.

Previous articleगजानन मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ….
Next articleशहरातील पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास बुधवारी धरणे आंदोलन करणार – अक्षय गोरंटयाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.