Home जळगाव शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सदैव प्रयत्नशील राहणारे कार्यक्षम नेतृत्व : ‘सत्यजीत...

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सदैव प्रयत्नशील राहणारे कार्यक्षम नेतृत्व : ‘सत्यजीत तांबे’

105

आशाताई बच्छाव

IMG_20240121_084713.jpg

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सदैव प्रयत्नशील राहणारे कार्यक्षम नेतृत्व : ‘सत्यजीत तांबे’.                                                             जळगाव,(प्रतिनिधी दिपक कदम)

आज सत्यजीत तांबे यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष मा. अण्णासाहेब पाटील सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास त्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली व त्यांना सेवापूर्ती काळासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी उपस्थित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांना संबोधित करताना त्यांनी यंदाच्या अधिवेशनात मंजूर झालेल्या त्यांच्या आग्रही मागण्याबद्दल भाष्य केले.

जुनी पेन्शन योजना, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी विविध बँकांमध्ये खाते खोलण्याच्या प्रश्नांबद्दल सरकारने सकारत्मक प्रतिसाद दिला आहे. सत्यजीत तांबे हे कायमच समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत असतात. त्यांनी आजवर काय काम केले व पुढील काळात ते प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कशा पद्धतीने पाठपुरावा करणार याबद्दल लोकांना माहिती देत असतात. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे समाजातील सर्व घटकांचा त्यांच्यावर एक विश्वास तयार झाला आहे आणि हाच विश्वास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये आज पाहायला मिळाला.

आगामी काळातही शिक्षकांचे तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी सत्यजीत तांबे यांनी केले.

Previous articleआगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची अमरावती विभागीय जिल्हानिहाय आढावा बैठक
Next articleयुती केली तरच टीकाल नाहीतर जेलमध्ये जाल- प्रकाश आंबेडकर.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.