Home अमरावती युती केली तरच टीकाल नाहीतर जेलमध्ये जाल- प्रकाश आंबेडकर.

युती केली तरच टीकाल नाहीतर जेलमध्ये जाल- प्रकाश आंबेडकर.

153

आशाताई बच्छाव

IMG_20240121_092631.jpg

युती केली तरच टीकाल नाहीतर जेलमध्ये जाल-
प्रकाश आंबेडकर.
————–
दैनिक युवा मराठा
पी एल देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
काँग्रेससह इतर सर्वच महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मानगुटीवर कारवाईची तलवार लटकून आहे. त्यामुळे जर भीत भीत निवडणुकीला समोर जाल तर सर्वांच्याच मानगुटीवर तलवार कोसळले आणि सोनिया गांधी पासून सर्व जेलमध्ये जातील. वंचितचा एकही नेता जेलमध्ये जाणार नाही. त्यामुळे युतीमध्ये लढाल तरच टीका नाही तर सर्व जेलमध्ये जाल अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी जाहीर सभेमध्ये व्यक्त केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने अमरावतीमध्ये जाहीर सभेतून एक प्रकारची शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील सायन्स कोर्स मैदानावर ही विराट जाहीर सभा पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकरांना ऐकायला लाखोंच्या संख्येने वंचित कार्यकर्ते व पदाधिकारी आले होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, दोन वर्षापासून महाविकास आघाडीत लोकसभेच्या ४८ वाटपा संदर्भात समझोता झालेला नाही. त्यामुळे खरंच यांना बीजेपीला हरवायचे आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. ते म्हणतात वंचितीला आम्ही दोन जागा देतो, त्यामुळे त्या जागा कोणत्या यासंदर्भात जेव्हा काँग्रेसवाल्यांना विचारणा केली तर म्हणतात, अजून आमचं ठरले नसल्याचे ते सांगतात. त्यामुळे जर बीजेपीला हरवायचं असेल तर युतीमध्ये तुम्हाला लढावं लागेल. वंचित तिला सोबत घेतलं तर ठीक नाहीतर आम्ही सर्व ४८ जागा ही लढविण्याची तयारी आहे. बीजेपी ची फक्त एक कमी कार्यक्रम सुरू असून त्यांना फक्त देशात एकच पक्ष ठेवायचा आहे. देशात राजकीय पक्ष टिकले पाहिजे. राजकीय पक्षात राहिले नाही तर देशातील लोकशाहीचा संपुष्टात येईल आम्ही कधीही सत्तेत नव्हतो त्यामुळे चोरी करण्याचा प्रश्नच नाही, जे सत्तेत होते त्यांनी चोरी केल्याचे मोदी सांगतात. त्यामुळे निवडणुका संपल्या सत्ता भोगणाऱ्यांना सर्वांना जेलमध्ये जावे लागेल. युती करायची नाही म्हणून ते बळीचा बकरा शोधत आहे. परंतु त्या प्रकारे गरीब मराठ्यांचा उपयोग केला त्या प्रकारे वंचित यांचा वापर करण्याचा विचार असेल तर बीजेपी सोबत तुम्हालाही काढल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला.

Previous articleशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सदैव प्रयत्नशील राहणारे कार्यक्षम नेतृत्व : ‘सत्यजीत तांबे’
Next articleदेशात धार्मिक, सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न. पुरुषोत्तम खेडकर.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.