Home नाशिक कानळद जि प शाळेच्या समीक्षा जाधव ची धावणे प्रकारात जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

कानळद जि प शाळेच्या समीक्षा जाधव ची धावणे प्रकारात जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

399

आशाताई बच्छाव

IMG_20240120_182802.jpg

कानळद जि प शाळेच्या समीक्षा जाधव ची धावणे प्रकारात जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा निफाड येथे नुकत्याच संपन्न झाल्या. त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानळद ता निफाड येथील विद्यार्थिनी समीक्षा गणेश जाधव हिचा धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला. तिला शाळेचे मुख्याध्यापक दिपक मोरे सर, किरण हासे सर, निशा साळवे मॅडम तसेच पालक गणेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल मा.भरसट मॅडम गटशिक्षणाधिकारी पं. स.निफाड,मा.वसंतराव गायकवाड शिक्षणविस्तार अधिकारी , गावडे सर केंद्रप्रमुख देवगाव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत जाधव , सरपंच शांताराम जाधव ,उपाध्यक्ष किरण जाधव , शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य कृष्णा जाधव , संतोष जाधव, विक्रम जाधव , प्रवीण पगारे, दिनकर जाधव, भागवत पारखे , रामराव मोरे , चांगदेव पारखे , सुनील जाधव , कैलास जाधव , बाबुराव जाधव , सर्जेराव पारखे , दत्तात्रय वाघ ,सर्व सदस्य , सर्व ग्रामस्थ , मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले. पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मुख्याध्यापक दिपक मोरे यांनी समीक्षाला कानळद एक्सप्रेस या नावाने गुणगौरव करून हार्दिक शुभेच्छा दिल्यात…

Previous articleमुखेड तालुक्यातील अंबुलगा येथील मुलगी झाली क्लासवन अधिकारी     
Next articleके. के. वाघ महाविद्यालय चांदोरीचे ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबिर–
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.