Home नांदेड मराठा आरक्षणासाठी चला मुंबई मिटिंग संपन्न व रोहीपिंपळगाव चिमुरडी हत्यारांना फाशी द्या...

मराठा आरक्षणासाठी चला मुंबई मिटिंग संपन्न व रोहीपिंपळगाव चिमुरडी हत्यारांना फाशी द्या , भुजबळ मराठ्यांचा बाप म्हणुन जातीय तेढ निर्माण करून मराठा समाजाच्या भावना दुखावनाऱ्या पडळकरां वर गुन्हा दाखल करा बद्द्ल प्रशासनास निवेदन.

110

आशाताई बच्छाव

IMG_20240119_080539.jpg

मराठा आरक्षणासाठी चला मुंबई मिटिंग संपन्न व रोहीपिंपळगाव चिमुरडी हत्यारांना फाशी द्या , भुजबळ मराठ्यांचा बाप म्हणुन जातीय तेढ निर्माण करून मराठा समाजाच्या भावना दुखावनाऱ्या पडळकरां वर गुन्हा दाखल करा बद्द्ल प्रशासनास निवेदन.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे )

 

आज दि. 18/01/2024 रोजी सकल मराठा समाज देगलूर च्या वतीने यशवंत पत संस्था येथे आयोजित मीटिंग मधे मुंबई येथील मराठा आरक्षणासाठी मनोज पाटील जरांगे यांच्या सभेला जाऊन मराठा आरक्षणाचा लढय़ात मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी देगलूर मधून हजारोंच्या संख्येने समाज बांधव मुंबईला जाणार असे ठरवण्यात आले. 22 तारखेला दुपारी दोन वाजता जिजाऊ चौक येथून मुंबई ला जाण्यासाठी मोठय़ा संख्येने समाज बांधव निघावे असे आव्हान देगलूर सकल मराठा समाज बांधवांनी केले आहे …. त्यानंतर रोहिपिम्पळगांव ता. मुदखेड येथील सहा वर्षा च्या चिमुरडी वर अत्याचार करून खून केल्याचा निषेध व्यक्त करून गुन्हा दाखल करून अटक करून फाशी देण्याची कार्यवाही करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी व पोलिस निरीक्षक देगलुर यांना निवेदन दिले . पडळकर यांनी एका सभेत छगन भुजबळ हे मराठ्यांचे बाप असे नीच पातळी वर जाऊन निंदनीय , वादग्रस्त व जातीय तेढ निर्माण करणारे विधान केले त्या बद्द्ल त्यांच्या वर गुन्हा दाखल करा असे निवेदन देण्यात आले .

Previous articleमिशन अयोध्या मंदिर स्वछता अभियान.
Next articleमराठा क्रीडा मंडळ एकोडीच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.