Home नाशिक जनता विद्यालयात युवादिन साजरा

जनता विद्यालयात युवादिन साजरा

133

आशाताई बच्छाव

IMG_20240114_175400.jpg

 

जनता विद्यालयात युवादिन साजरा

नाशिक,(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ):- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. १३/१/२०२४ रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन व राजमाता जिजाऊ ह्यांची जयंती साजरी करण्यात आली. ह्या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता १० वी ब च्या वर्गाने केले होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली . ह्यानंतर प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. माधुरी पिंगळे ह्यांनी केले. व व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका के.एस.आगळे होत्या. जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त तृप्ती राजगुरू यांनी गीत सादर केले. तसेच जयेश चौघुले , आर्यन जाधव यांनी पोवाडा सादर केला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने नयन गाडेकर ह्याने भाषण केले. १० वी कचा पीयुष मुर्तडक ह्याने स्वतः स्केच केलेले चित्र मुख्याध्यापिका व सर्व शिक्षिकांना भेट स्वरूपात दिले. विद्यालयात नवनिर्वाचित शिक्षकांचे स्वागत मुख्याध्यापिकांतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का सुग्रामकर हिने केले व आभार प्रदर्शन एकता ताजणे हिने केले.

Previous articleअनसिंग येथे घरोघरी पोहोचल्या अक्षदा. 22 जानेवारीला होणार प्राणप्रतिष्ठा सोहळा.
Next articleखा. रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा निवडून दिल्यास जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास-सुभाष देविदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.