Home अमरावती पक्षपाती निर्णया विरोधात बडनेरा येथे शिवसेनेची निदर्शने शिंदे सरकार व राहुल नार्वेकरांचा...

पक्षपाती निर्णया विरोधात बडनेरा येथे शिवसेनेची निदर्शने शिंदे सरकार व राहुल नार्वेकरांचा यांचा निषेध. ————–

114

आशाताई बच्छाव

IMG_20240111_171056.jpg

पक्षपाती निर्णया विरोधात बडनेरा येथे शिवसेनेची निदर्शने
शिंदे सरकार व राहुल नार्वेकरांचा यांचा निषेध.
————–
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.(बनेडरा)
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात
शिवसेना पक्षाची घटना नाकारून तसेच सुप्रीम कोर्टाचे निर्देश डावलत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदेंची असल्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून हा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप करीत शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वात बडनेरा जुनी वस्ती चौकात निदर्शने करीत शिंदे सरकार व राहुल नार्वेकरांचा निषेध करण्यात आला..
शिवसेना कुणाची यासंदर्भात निर्णय येताच संतप्त शिवसैनिकांनी बडनेरा जुने वस्ती चौकात एकत्र येत शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन करीत घोषणाबाजी केली आणि शिंदे सरकार तसेच राहुल नार्वेकर यांचा निषेध केला. सुप्रीम कोर्टाचे निर्देश डावलत नार्वेकरांनी दिलेला निर्णय अत्यंत चुकीचा असून हा निर्णय पक्षपातीपणा आणि भेदभाव करणारा असल्याचे दिसून आले आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणात न्याय मिळणार असा विश्वास व्यक्त करीत या तथाकथित व कुनियोजित निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या बद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आदर निर्माण झाला आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी यावेळी दिली. या निदर्शने आंदोलनामध्ये राजूभाऊ अक्कलवार, कुच्चीन कैतवास, अक्रम पठाण ,शारीक भाई ,संदीप इंगोले ,नवाब भाई, प्रशांत डेंगळे ,विकास शेळके ,महेश पवार ,जुबेर भाई, सागर ढोके ,सुफियान भाई रिंकू पंचवटे , रफिक भाई आदी सहभागी झाले होते.

Previous articleअमरावतीत शिंदे गटाचा राजकमल चौकात जल्लोष: फटाक्याचे आतशबाजी, ढोल ताशे, भगवे ध्वज, बुंदीच्या लाडूचे वाटप
Next articleनाशिकरोडला शिवजन्मोत्सव समितीची स्थापना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.