Home नांदेड देगलुरच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामाचे लवकरात लवकर भूमिपूजन करुन कामाला सुरुवात करण्याबाबत,...

देगलुरच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामाचे लवकरात लवकर भूमिपूजन करुन कामाला सुरुवात करण्याबाबत, मुख्यमंत्र्या कडे निवेदनाद्वारे मागणी.

434

आशाताई बच्छाव

IMG_20240111_075429.jpg

देगलुरच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामाचे लवकरात लवकर भूमिपूजन करुन कामाला सुरुवात करण्याबाबत, मुख्यमंत्र्या कडे निवेदनाद्वारे मागणी.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे )

देगलुरच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामाचे लवकरात लवकर भूमिपूजन करुन कामाला सुरुवात करण्याबाबत ,मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, यांना मंत्रालयात पत्र पाठवून दिले असता मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंत्रालयातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, विकास विभागाकडे पत्र पाठवण्यात आले,व पशुसंवर्धन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव तुकारामजी मुंडे साहेब यांच्या कडे पत्र पाठविण्यात आले,मग मंत्रालयात पशुसंवर्धन विभागाचे कक्ष अधिकारी मानसिंग पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुर्ण पणे देगलूरचे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांचे देगलूरच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात लवकर करण्याबाबतचे पुर्ण विषय ऐकून घेतले व मी पण पुढे पत्र पाठवून देतो, तरी तुम्ही एकदा पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ केंडे साहेब यांच्याशी बोलण्यास सांगितले,त्यावर देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ केंडे साहेब यांच्याशी संपर्क साधला व सविस्तर म्हणणे मांडले व त्यांनी हा विषय पुर्ण पणे ऐकून त्यांनी पुढे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ पडिले साहेब यांना बोलण्यास सांगितले व यांच्याशी व सहाय्यक आयुक्त डॉ काटमकर आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बोधनकर साहेब यांच्याशी पण देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी संपर्क साधला असता ,त्यांनी देगलूर च्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात लवकरच करु असं बोलून आणि कामाला सुरुवात केली आहे जागा पुर्ण साफसफाई करून घेतलं झाडं झुडपे व जुनं बांधकाम सर्व साफ करून मार्कआऊट टाकणे व सामान येथे सुरुवात केली असून सिमेंटचे ट्रक पण आलेला आहे लवकरच भुमिपुजन करून कामाला सुरुवात करु असं आश्वासन पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ पडिले साहेब यांनी देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांना फोनद्वारे सांगितले…..
यासाठी देगलूरकरांच्या आशा पल्लवीत….
यावर देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी देगलूर च्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात लवकरच होईल असे सांगितले…

Previous articleखुनाच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक व्हावी म्हणून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण
Next articleनेवासा फाटा येथे पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.