Home जळगाव चोरीची कार छत्रपती संभाजीनगर येेेथून जप्त

चोरीची कार छत्रपती संभाजीनगर येेेथून जप्त

116

आशाताई बच्छाव

IMG_20231230_185043.jpg

चोरीची कार छत्रपती संभाजीनगर येेेथून जप्त
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव शहरातून चोरीस गेलेल्या कारचा शोध लावण्यात पोलीसांना यश आले आहे. ही चोरीस गेलेली टोयाटो ईनोव्हा कार चाळीसगांव शहर पोलीसांनी छत्रपती संभाजी नगर येथून जप्त केली आहे.
चाळीसगांव शहरातील मुकेश यापुराव चौधरी यांच्या मालकीची क्रमांक एमएच.19 डीए.2777 ही टोयाटो ईनोव्हा कार अज्ञात आरोपीतांनी चोरुन नेल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला होता.पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सदर चोरीस गेलेल्या वाहनाचे हनाचे शोधासाठी एक पथक तयार केले होते. सहा. पोलीस निरीक्षक दिपक बिरारी,हवालदार राहुल सोनवणे, योगेश बेलदार, दिपक पाटील, महेंद्र पाटील,पवन पाटील, राकेश महाजन, रविंद्र यच्छे, नंदकिशोर महाजन, अजय पाटील, आशुतोष सोनवणे, निलेश पाटील, समाधान पाटील अशांनी सदर गुन्ह्यातील वाहनाचा कसुन शोध घेतला. तसेच चाळीसगांव ते मालेगांव पावेतो सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासणी करण्यात आली होती. तसेच चाळीसगांव शहराच्या लगत असलेल्या सर्व जिल्ह्यांना ईनोव्हा कार चोरीबाबत माहीती देण्यात आली होती.
ही कार छत्रपती संभाजी नगर येथील शहानुरमिया दर्गा चौकाच्या परिसरात लावल्याची माहीती गुन्हे शाखेला प्राप्त झाली. सदर वाहन छत्रपती संभाजी नगर पोलीसांनी ताव्यात घेतले होते. ती कार चाळीसगांव शहर पोलीसांनी छत्रपती संभाजी नगर येथुन ताब्यात घेवुन फिर्यादी मुकेश चौधरी यांना आज रोजी परत केली. आहे.
वाहन परत मिळाल्याबद्दल फिर्यादी मुकेश चौधरी यांनी पोलीसांचे आभार मानले. दरम्यान पोलीसांतर्फे जनतेस आवाहन करण्यात आले आहे की, किंमती वाहने रस्त्यावर न लावता घराचे कम्पाउंडमध्ये लावावीत. रात्रीच्या वेळी घराच्या आजुबाजुला लाईट चालु ठेवावीत. तसेच जी.पी.एस. टेक्नॉलॉजी सारखे अद्यावत तंत्रज्ञान वाहनांना लावुन घ्यावेत. तसेच घराच्या आजुबाजुला किंवा कॉलनी परिसरात एकत्रित रित्या सीसीटिव्ही कॅमेरे लावुन पोलीसांना सहकार्य करावे.

Previous articleदत्तजयंती निमित्ताने नाशिकरोडला प्रसादाचे वाटप
Next articleखेळातून सांघिक भावना वाढीस लागते – संपदाताई पाटील…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.