आशाताई बच्छाव
नेवासा,(कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी )- मध्य प्रदेशचे काँग्रेसचे माजी मंत्री व विद्यमान राज्यसभा सदस्य तसेच केंद्र सरकारच्या अंन व नागरी पुरवठा स्टँडिंग कमिटी सदस्य राजमनी पटेल जी यांनी आज शनी शिंगणापूर येथे भेट देत उदासी महाराज मठात अभिषेक केला व चौथऱ्यावर जाऊन तैलाभिषेक करत शनी दर्शन घेतले.या वेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत लुणिया व अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी त्यांचे स्वागत करत सत्कार केला.या वेळी शिंगणापूर देवस्थानच्या वतीने विश्वस्त अप्पासाहेब शेटे यांनी खा पटेल यांचा सत्कार केला तसेच शिंगणापूर देवस्थानच्या सुरू असलेल्या विकास कामाची माहिती दिली , अप्रतीम अशी दर्शन रांग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. खा पटेल हे देखील दर्शन घेऊन नागपूर येथे दिनांक २८ रोजी “है तैयार हम” या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत असलेल्या राहुल गांधी यांच्या विशाल सभेसाठी रवाना झाले.






