Home जळगाव छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालण्यासाठी शिडी तात्काळ करावी मराठा महासंघाची निवेदनाद्वारे...

छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालण्यासाठी शिडी तात्काळ करावी मराठा महासंघाची निवेदनाद्वारे मागणी

118

आशाताई बच्छाव

IMG_20231221_045926.jpg

छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालण्यासाठी शिडी तात्काळ करावी मराठा महासंघाची निवेदनाद्वारे मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालण्यासाठी शिडी करावी व आजूबाजूचा परिसर तात्काळ स्वच्छ करण्यात यावा मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा महासंघाच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे 20 डिसेंबर 2023 रोजी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असून महाराजांना हार घालण्यासाठी कुठलीही सुविधा नाही. मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांची जाहीर सभा असताना छत्रपतींना गळ्यात हार घालण्यासाठी अडचण झाली होती
तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी शिडीची व्यवस्था करून आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आहे.
निवेदनावर जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, कैलास पाटील, नंदकिशोर पाटील, अशोक भोसले, तमल देशमुख, दिनकर कडलग, किरण आढाव, खुशाल पाटील, कैलास देशमुख, सदाशिव आप्पा गवळी आदी मराठा बांधवांच्या सह्या आहेत.

Previous articleचाळीसगावात घरातून सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास
Next articleफरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.