आशाताई बच्छाव
सुरक्षारक्षक गौरव सोहळ्यात चित्रकारप्रदीप शिंदे यांचा सन्मान
सुदर्शन बर्वे ( भगुर प्रतिनिधी) सुरक्षारक्षक आपले नियमित कामगिरी सांभाळत असताना समाजसेवी वृत्ती दाखवून इतरांना ही मदत करतात या बाबीचा विचार करत नाशिक येथील वडगांव पिंगळा येथे वास्तव्यास असलेले प्रदीप भाऊसाहेब शिंदे यांना कोपरखैरणे (मुंबई) येथे सुरक्षारक्षक गुणगौरव सोहळा कार्यक्रमात सन्मानित करून प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह बहाल करण्यात आले यावेळी प्रदीप शिंदे सोबत राज्यातील इतर सुरक्षा रक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला.
मुंबई येथील कोपरखैरणे येथील मनपा शाळा क्रमांक ३१ मध्ये सुरक्षारक्षक गौरव सोहळा- २०२३ चे आयोजन प्रवीण विटेकर सह आयोजक संतोष खामकर,दीपक चाळके यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी प्रदीप शिंदे यांनी चित्रकला व लिफ्ट आर्ट मध्ये उत्कृष्ट कामगिरी दर्शविल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके,सचिन गौरव नालींदे कामगार प्रतिनिधी चंद्रकांत बोबडे, हनुमंत सुरवसे,अशोक पाटील, लक्ष्मणराव भोसले,अजिंक्य भोसले , असलम इनामदार,अशोक कळसकर,मकरंद होमने आदी उपस्थित होते
सुरक्षा रक्षक कामावर कर्तव्यदक्षक असताना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे म्हणजे कंपनीमधील मालमत्तेची चोरी करतेवेळी चोराला पकडणे कंपनीमधील जीविताचे प्रसंगावधान राखत रक्षण करणे व ज्या सुरक्षारक्षकांना समाजसेवा कला गुण कौशल्य विविध खेळांमध्ये पारितोषिक मिळाली असतील, अशा सुरक्षारक्षकांचा गुणगौरव सोहळा या माध्यमातून केला जातो त्यात चित्रकार प्रदीप शिंदे यांचा सन्मान करण्यात आल्याने नाशिक येथे त्यांचे कौतुक होत आहे






