Home जळगाव चाळीसगावातून दोन सख्खे भाऊ बेपत्ता

चाळीसगावातून दोन सख्खे भाऊ बेपत्ता

258

आशाताई बच्छाव

IMG_20231218_191622.jpg

चाळीसगावातून दोन सख्खे भाऊ बेपत्ता

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- शाळेत गेेेेलेले दोघे लहान भाऊ शाळा सुटल्यानंतर घरी आलेच नाही. या दोन्ही भावांना कोणीतरी फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण भावलाल सोनवणे (35) रा. मिलींद नगर, रेल्वे क्वॉर्टरच्या पाठीमागे, चाळीसगाव हे दि.13 रोजी भुसावळ येथे उसतोडीसाठी गेले होते. त्यांची दोन्ही मुले रूद्र किरण सोनवणे (6 ) व आर्यन किरण सोनवणे (11) हे सकाळी सम्राट अशोक प्राथमिक विद्यालयात शाळेत गेले.
सायंकाळी 6 वाजता त्यंाना बहिणीने फेान करून सांगितले की, मुले रूद्र व आर्यन हे अद्यापपावेतो घरी आले नाही. सोनवणे यांची सासू घरी आली व मुलांना बामोशी बाबा दर्गा येथे दर्शन घेऊन येते, दोन्ही मुले माझ्याकडेच आहेत काळजी करू नका असे सांगितले.परंतू सायंकाळ झाली तरी मुले व सासू घरी परतली नाही.
सोनवणे यांनी बहिणीच्या मदतीने दोन्ही मुले व सासू यांचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे मुलगा रूद्र व आर्यन यांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञानाचा फायदा घेऊन फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद
किरण सोनवणे यांनी दिल्यावरून चाळीसगाव शहर पेालीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत.

Previous articleचाळीसगावात घरासमोरून इनोव्हा कार चोरी
Next articleनांदेड जि.प. चा मनमानी कारभार माळेगाव यात्रा नियोजन बैठकीला आ.मोहन अण्णा हंबर्डे यांना डावलण्याचा प्रताप ! श्रीनिवास मोरे यांनी केला धिक्कार !!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.