Home उतर महाराष्ट्र जैन मंदिरासमोरचा रस्ता खासगी व्यक्तीच्या नावावर ; नेवासे तालुक्यातल्या सोनईतला धक्कादायक प्रकार...

जैन मंदिरासमोरचा रस्ता खासगी व्यक्तीच्या नावावर ; नेवासे तालुक्यातल्या सोनईतला धक्कादायक प्रकार ; सर्वच संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा ; संतप्त व्यापारी बांधवांची मागणी

155

आशाताई बच्छाव

IMG_20231215_081317.jpg

जैन मंदिरासमोरचा रस्ता खासगी व्यक्तीच्या नावावर ; नेवासे तालुक्यातल्या सोनईतला धक्कादायक प्रकार ; सर्वच संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा ; संतप्त व्यापारी बांधवांची मागणी.                           नेवासा ,( कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी)

गेल्या अनेक वर्षांपासून ज्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी सरकारी तिजोरीतून लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊन काँक्रिटीकरणाची कामं करण्यात आली आणि महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा असलेला रस्ता चक्क खासगी व्यक्तीच्या नावावर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेवासे तालुक्यातल्या सोनईतला हा प्रकार असून यासाठी जबाबदार असलेल्या ग्रामसेवकासह सिटी सर्वे कार्यालयातल्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी सोनईतल्या संतप्त व्यापारी बांधवांमधून केली जात आहे.

 

विशेष म्हणजे ज्या सोनई ग्रामपंचायतीच्या कार्यालयात हा ठराव करण्यात आला, त्या ठरावावर सोनईच्या सरपंचाची सहीच नसल्याचं व्यापारी बांधवांनी सांगितलंय.

 

जोपर्यंत हा वाद मिटणार नाही, तोपर्यंत अन्न त्याग उपोषण करण्याचा इशारा सोनईच्या संतप्त व्यापारी बांधवांनी दिलाय.

 

दरम्यान, व्यापारी बांधवांच्या या उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. सरपंच पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाच हा प्रकार माहिती नाही. हे असं राजरोसपणे व्हायला लागलं, तर सामान्य माणसाचं काय होणार, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जात आहे

Previous articleमराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख पदी खुशाल बिडे यांची निवड
Next articleअलिबाग कलेक्टर ऑफीस समोर :- समाजसेवक निलेश सु चवरकर व सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा ताई नि चवरकर यांचे उपोषण सुरू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.