आशाताई बच्छाव
मयुर खापरे चांदुर बाजार
स्थानिक कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय, चांदुर बाजार येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतिने 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘महापरिनिर्वाण दिन’ साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता चोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन केले.
सदरप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. एन. एस. चवरे, प्रा. डॉ. जे. वाय पडोळे, प्रा. डॉ. देशमुख, प्रा. डॉ. एम. पी. सहारे, प्रा. विपुल चुके, प्रा. अनिकेत वानखडे, प्रा तुलसीराम राजोरिया, श्री. अनिल भाकरे, श्री. किशोर खवले, श्री. विनोद अढाऊ, श्री. भाष्कर तिखे तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






