Home नांदेड मानवी हक्क भारतीय राज्यघटनेचा आत्मा- सतीश देशपांडे.

मानवी हक्क भारतीय राज्यघटनेचा आत्मा- सतीश देशपांडे.

121

आशाताई बच्छाव

IMG_20231211_205550.jpg

मानवी हक्क भारतीय राज्यघटनेचा आत्मा- सतीश देशपांडे.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर : अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलुर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने जागतीक मानवी हक्क दिना निमित्त प्रा सतिश देशपांडे यांचे ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार हे होते. मानवी हक्काचे भारतीय राज्यघटनेतील प्रतिबिंब या विषयावर आपले विचार व्यक्त करताना प्रा. सतिश देशपांडे यांनी मानवी हक्काचे भारतीय व पाश्चिमात्य ऐतिहासिक पार्श्वभूमी ग्रीक रोमन भगवान गौतम बुद्ध, भगवान वर्धमान महावीर, महात्मा बस्वन्ना, वारकरी परंपरा यातुन अभिव्यक्त होते. मानवी हक्क व्यक्तीला जन्मतः प्राप्त होतात. व्यक्तीच्या विकासासाठी मानवी हक्काची आवश्यकता आहे.10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा घोषित केला. तेंव्हापासून संपुर्ण जगभर 10डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिवस म्हणुन साजरा केला जातो. हक्क म्हणजे काय? भारतीय राज्यघटनेत मानवी हक्क कोणकोणत्या कलमात समाविष्ट आहेत. जगात व भारतात मानवी हक्काचे उल्लंघन वर्तमान काळात कसे होत आहे हे उदाहरण देवुन स्पष्ट केले. मानवी हक्काचे संरक्षण करण्याचे कार्य भारतीय न्यायव्यवस्था करत आहे. ते स्थानीक. राज्य व राष्ट्रीय पातळीवर होत आहे. परंतु त्यातही अनेक दोष आहेत. जातीयता, धर्मांधता, संकुचित व स्वार्थी प्रवृत्ती मानवी हक्का समोरील आव्हाने आहेत. या आव्हानांचा यशस्वी सामना करण्यासाठी सर्वांनी आपल्या हक्का सोबतच कर्तव्याला अधिक प्राधान्य द्यावे हा गांधीवादी विचार सर्वांनी अंगिकारावा. राष्ट्र संघ व संयुक्त राष्ट्र संघाने मानवी हक्काचा संरक्षणासाठी जे प्रयत्न केले. ज्या तरतुदी युनो च्या कलमात आहेत. त्याच तरतुदी किंबहुना त्यापेक्षा अधिक प्रभावीपणे भारतीय राज्यघटनेत मानवी हक्क नमुद केले आहेत. भारतीय राज्यघटना सामाजिक न्याय, लोकशाही, धर्मनिपेक्षता, स्वातंत्र्य व न्यायाचे प्रतीक आहे. तसेच ती मानवी हक्काचा आत्मा आहे. याचा अर्थ असा की संविधानाच्या प्रत्येक कलमास, उद्देशपत्रिकेत मानवी हक्काची झालर आहे. वक्त्यांच्या मांडणीनंतर साधक बाधक चर्चा झाली. ज्यात प्राचार्य डॉ. बेटकर एम एम. यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा डॉ संजय पाटील यांनी आपले प्रश्न विचारून या कार्यक्रमास मानवी हक्काची किनार दिली. प्रा डॉ. घोलेकर, सोनपेठ यानींही कांही प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नास वक्त्यांनी योग्य व समर्पक उत्तरे दिली. अध्यक्षीय समारोप करताना उप प्राचार्य डॉ अनिल चिद्रावार यांनी व्यक्तीला जगण्यासाठी जसी शुद्ध हवा आवश्यक आहे अगदी त्याचप्रमाणे मानवी हक्क महत्वाचे आहेत असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व वक्त्याचा परिचय राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. माधव चोले यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व नागरीक उपस्थित होते.

Previous articleविकसित भारत संकल्प यात्रा” या मोहिमेच्या रथाचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते आज चांदसणी ता. चोपडा येथे शुभारंभ
Next articleअमरावती शहरात १लाख ८५ हजाराचे १०२ चाकुसह २ देशी कट्टासह ६आरोपींना अटक.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.