आशाताई बच्छाव
विकसित भारत संकल्प यात्रा” या मोहिमेच्या रथाचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते आज चांदसणी ता. चोपडा येथे शुभारंभ
————————————
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थींशी संवादाचा घेतला लाभ
जळगांव प्रतिनिधी विजय पाटील– भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने दि.15 नोव्हेंबर 2023 ते दि.26 जानेवारी 2024 या कालावधीत
विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहिम राबविण्यात येणार असून मोहिमेच्या जळगांव जिल्ह्यात फिरणाऱ्या रथापैकी चोपडा तालुक्यातील चांदसणी
येथे रथाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
विविध योजनांच्या माध्यमातून एक तरी लाभ आपणास मिळावा यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरू आहे. हा लाभातून आपण आत्मनिर्भर होणार असून यातून देश आणि देशवासी विकसित होणार असल्याचा मनोदय घेऊन ही संकल्प यात्रा आपल्या दारापर्यंत येणार असल्याचा आनंद असल्याची भावना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सकाळी अकरा वाजता खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते तर माजी आमदार स्मिताताई वाघ, सरपंच मिराबाई भालेराव यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ उपस्थीत लाभार्थी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतला. यानंतर खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृतीसाठी हा रथ रवाना करण्यात आला.
खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात *भारत सरकार* च्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल-मे 2018 या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान
तसेच माहे
जुन-ऑगस्ट 2018 या कालावधीत विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले असून, अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उददेशाने *”विकसित भारत संकल्प यात्रा”*
ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यांत आली असून, आज चांदसणी येथून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून ही एल ई डी माहितीपट असलेला रथ तालुक्यात फिरणार आहे. यावेळी मान्यवर, पदाधिकारी, आशा सेविका,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.






