Home जालना बी. एस. फोर्सच्या शहराध्यक्षपदी कांबळे, शहर महासचिवपदी

बी. एस. फोर्सच्या शहराध्यक्षपदी कांबळे, शहर महासचिवपदी

110

आशाताई बच्छाव

IMG_20231206_071054.jpg

बी. एस. फोर्सच्या शहराध्यक्षपदी कांबळे, शहर महासचिवपदी
कांबळे तर तालुकाध्यक्षपदी वाघमारे यांची निवड
जालना (दिलीप बोंडे) ः बहुजन शोषित समाज-शिव-संघर्ष सेना (बी. एस. फोर्स) या सामाजिक संघटनेच्या वतीने सर्वे नं. 488 विश्राम गृह येथे पदाधीकाऱ्यांचे सत्कार संस्थापक अध्यक्ष प्रमोद खरात यांच्याहस्ते करण्यात आला. तसेच शहराध्यक्षपदी सुरेश  कांबळे, शहर महासचिवपदी गणेश कांबळे तर तालुकाध्यक्षपदी मछिंद्र वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रमोद खरात यांनी संघटनेच्या ध्येय-धोरणाची सविस्तर माहिती देऊन संघटनेच्या मार्गदर्शक तत्वाची जोपासना करीत समाज-राज्य आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटना बळकट करून लोकशाहीला पूरक असे वातावरण समाजात निर्माण करून समाजाला योग्य प्रवाहाच्या दिशेने नेण्यासाठी संघटनेचे महत्व पटवून दिले. यावेळी प्रकाश एडके, गणेश वाहुळे, राजेंद्र खंदारे, इस्माईल सय्यद, शेख ईसा, राजू बोर्डे, अविनाश दाभाडे, विशाल गायकवाड, आशिष पाडमुख, विजय आढाव आदींची उपस्थिती होती.