Home गडचिरोली जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत अनुप कोहळे द्वितीय

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत अनुप कोहळे द्वितीय

103

आशाताई बच्छाव

IMG_20231203_062438.jpg

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत अनुप कोहळे द्वितीय

गडचिरोली,( सुरज गुंडमवार ):: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली च्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान घेण्यात आलेल्या (कथालेखन) स्पर्धेत अनुप वसंत कोहळे मु. राजनगट्टा, ता. चामोर्शी येथील युवक द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
12 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या युवा महोत्सवाची ही निवड चाचणी असून अनुप कोहळे यांची आता विभागस्तरीय स्पर्धेकरीता निवड झालेली आहे. जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल अनुप कोहळे यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांच्या हस्ते 2 हजार रुपयाचा धनादेश आणि सन्मान पत्र देऊन देऊन सत्कार करण्यात आला. पुढील स्पर्धा ही विभागीय स्तरावर 5 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येते पार पडणार आहे.

Previous articleजागतिक एडस दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली उत्साहात संपन्न
Next articleमौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी ३० कोटींवरून आता ५०० कोटी रुपयांची शासन हमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.