Home जालना ब्राह्मण समाजाच्या आंदोलनास मराठा योद्धा जरांगे यांनी दिली भेट माजी मंत्री टोपे,...

ब्राह्मण समाजाच्या आंदोलनास मराठा योद्धा जरांगे यांनी दिली भेट माजी मंत्री टोपे, आ. राजेश टोपे यांच्यासह विविध मान्यवरांनी दिल्या भेटी

168

आशाताई बच्छाव

IMG_20231202_175932.jpg

ब्राह्मण समाजाच्या आंदोलनास मराठा योद्धा जरांगे यांनी दिली भेट
माजी मंत्री टोपे, आ. राजेश टोपे यांच्यासह विविध मान्यवरांनी दिल्या भेटी
जालनाः(दिलीप बोंडे)-ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावे म्हणून गत चार दिवसांपासून ब्राह्मण समाजसेवक दीपक रणनवरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या उपोषणास शुक्रवारी दुपारी मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी वेळातवेळ काढून ब्राह्मण समाजाच्या आंदोलनस्थळी भेट दिली. प्रचंड अशा जनसमुदायातून जरांगे यांनी वाट काढून रणनवरे व समाजबांधवांची भेट घेऊन काही वेळ चर्चा केली. दरम्यान, शुक्रवारी माजीमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पूर्णपणे पाठिंबा असल्याचे सांगून मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
खोतकर व टोपे यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. रणनवरे यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस असून, शेकडो बांधवांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. अनेक समाजबांधव स्वयंस्फूर्तीने उपस्थिती लावत आहेत. विविध जाती, समुहाच्या वतीने पाठिंबे दिले जात आहेत.

शैलेश घुमारे यांनी दिला पाठिंबा
युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश घुमारे यांनी शुक्रवारी आंदोलनकर्ते दीपक रणनवरे यांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा असल्याचे पत्र दिले. यावेळी युवासेनेचे पदाधिकारी तसेच  शैलेश घुमारे मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रणनवरे यांची आरोग्य तपासणी
अन्नत्याग करणारे मुख्य आंदोलक दीपक रणनवरे यांची शुक्रवारी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून प्रकृतीचा आढावा घेतला. यावेळी सामान्य रूगणालयाचे वैद्यकीय पथक उपस्थित होते.

Previous articleहिवाळ्यातच साकळगावात पाण्याची बोंब : पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा
Next articleखेळातून सांघिक भावनेचा विकास होतो – जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.