Home नांदेड दुष्काळी मदत व पीकविमा वाटप करा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयास कुलूप...

दुष्काळी मदत व पीकविमा वाटप करा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा

126

आशाताई बच्छाव

IMG_20231129_065047.jpg

दुष्काळी मदत व पीकविमा वाटप करा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत व पिकविमा त्वरित 30 नोव्हेंबर पर्यंत वाटप करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज दि.28 नोव्हेंबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देऊन तहसील कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली*
याबाबत अधिक माहिती अशी की, देगलूर तालुक्यात गेल्या जुन, जुलै महिन्यात झालेल्या ढगफुटी सददृश अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात खरीप हंगामातील सोयाबीन, तुर, मुग, उडीद, कापूस, आदी पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन 4 महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे शासनाने मदतही जाहीर करण्यात आला आहे दसरा, दिवाळी सण सुद्धा होऊन बराच कालावधी उलटून गेला आहे अद्यापही शेतकऱ्यांना दुष्काळी मदत व 25/ टक्के अग्रीम रक्कम वाटफ न झाल्याने शेतकरी बांधवांना शारीरिक मानसिक, आर्थिक. अडचणीत वाढ झाली आहे अनुदान वाटप करण्यात आले नसल्याने असंतोष पसरला आहे त्यामुळे त्वरित दुष्काळी मदत , पीकविमा वाटप करण्यात यावे अन्यथा तहसील कार्यालयास व पीकविमा कार्यालयास कुलूप लावून आमरण उपोषणाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व तहसील कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख
– महेश पाटील शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर शिवसेना मतदारसंघ समन्वयक नागनाथ वाडेकर शहर प्रमुख बालाजी मैलागिरे युवा सेना तालुका समन्वयक तथा शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख भागवत पाटील सोमुरकर उपशहरप्रमुख बाबुराव मिनकीकर युवा सेना तालुका समन्वयक सोशल मीडिया तालुकाप्रमुख, रवि. उल्लेवार युवा सेना शहर प्रमुख, संजय जोशी शिवसेना उपशहरप्रमुख, बाबुराव मिनकीकर आदीसह असंख्य पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थितीत होते

Previous articleक्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनी अभिवादन!
Next articleटोम्पे महाविद्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.