Home जळगाव चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट मध्ये 415 हेक्टर शेती बाधित….

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट मध्ये 415 हेक्टर शेती बाधित….

251

आशाताई बच्छाव

IMG_20231128_060655.jpg

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट मध्ये 415 हेक्टर शेती बाधित….

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील काही भागात दिनांक 26/11/2023 रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा पिकासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. दि 27 रोजी झालेल्या नुकसानग्रस्त भागाची तहसीलदार प्रशांत पाटील चाळीसगाव यांनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह पाहणी केली.
चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड निकुंभ, तळोंदे प्र दे, काकडणे, नांद्रे, तमगव्हाण या भागामध्ये झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये मुख्य कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रशांत पाटील यांनी मंडळ अधिकारी गणेश लोखंडे व चेतन देवरे तलाठी तळोदे प्र.दे, कृषी सहाय्यक सानप आणि स्थानिक कोतवाल कर्मचारी यांच्यासह शेतावर जाऊन समक्ष पाहणी केली.
अनेक नुकसान ग्रस्त शेतकरी यांचेशी संवाद साधून त्यांना धीर देण्यात आला. यावेळी तहसीलदारांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. नुकसानीच्या प्राथमिक अंदाजानुसार एकूण अंदाजे बाधित शेतकरी संख्या 575,
अंदाजे बाधित क्षेत्र अंदाजे 415 हेक्टर असून याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत स्थानिक कृषी सहाय्यक आणि तलाठी , ग्रामसेवक यांनी संयुक्त पंचनामे करून नुकसानी बाबत सविस्तर अहवाल शासनास सादर केला जाणार आहे. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

Previous articleअवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश
Next articleकाचेवरील दव पुसण्याचे नादात ताबा सुटून तवेरा कन्नड घाटात कोसळली… मालेगावचे जण जागीच  4 ठार – चालकासह 6 जखमी…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.