Home जळगाव अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश

139

आशाताई बच्छाव

IMG_20231128_060144.jpg

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- काल संध्याकाळी व रात्री चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती व फळपिकांचे तसेच घरांचे, गोठशेड, पोल्ट्री आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना मी महसूल प्रशासनाला दिल्या असून त्यानुसार पंचनामे देखील सुरू झाले आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असेल त्यांनी नुकसानीची माहिती पीकविमा एप वर नोंदवावी किंवा कृषी विभागाला रीतसर अर्ज करून द्यावी, या अस्मानी संकटाच्या काळात केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील.

– आमदार मंगेश चव्हाण

Previous articleवाशिम येथे सात दिवसीय श्रीमद् भागवत गिता ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन
Next articleचाळीसगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट मध्ये 415 हेक्टर शेती बाधित….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.