Home नाशिक भगुर येथे मराठायोध्या मा श्री मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत

भगुर येथे मराठायोध्या मा श्री मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत

164

आशाताई बच्छाव

IMG_20231124_135325.jpg

सुदर्शन बर्वे (भगूर प्रतिनिधी )
भगुर येथे मराठायोध्या मा श्री मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत
काल दिनांक २२/११/२०२३ रोजी मराठायोध्या मा श्री मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे पार पाडणार होती या निमित्ताने श्री जरांगे पाटील हे भगुर येथे आले असता त्यांचे ढोल ताशांच्या गजरात तसेच रंगबिरंगी फुलांची सजावट व उधळण करून फटाके फोडून जंगी स्वागत सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आले सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली असताना आता ठीकठिकाणी सभा पार पडत असल्याने याला सकल मराठा समाज एकवटल्याचे दिसुन येते आहे याच अनूसंधाने आज भगुर येथे आलेले मा श्री जरांगे पाटील यांचे औक्षण करण्यात आले व यांच्या हस्ते सकल हिंदूस्थाना चे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज व भगूर पुत्र क्रांतीसुर्य स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचे
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले , मा श्री मनोज जरांगे पाटील यांना स्वा.वि.दा.सावरकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली. त्यानंतर स्वा.वि.दा. सावरकर यांच्या जन्मस्थळाला सदिच्छ भेट देऊन मा श्री मनोज जरांगे पाटील हे पुढिल सभे साठी रवाना झाले असून प्रसंगी भगुर येथिल सकल मराठा समाज बांधव, माता- भगिनी , अबाल वृध्द,आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हजर होते

Previous articleप्रतिभा साहित्य संघ महाराष्ट्र चीत्रांगणा 2023 ग्रामदिप पुरस्कार दिनेश आमझरे यांना जाहीर
Next articleमनोज जरागे पाटील साठी रक्ताने काढलेली प्रतिमा सुपूर्द
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.