Home गडचिरोली खळबळजनक  गडचिरोली जिल्ह्यातील           टीटोळाच्या पाटलाची नक्षल्यांकडून हत्या, तिन...

खळबळजनक  गडचिरोली जिल्ह्यातील           टीटोळाच्या पाटलाची नक्षल्यांकडून हत्या, तिन ते चार नागरिकांचे अपहरण,

139

आशाताई बच्छाव

IMG_20231124_134226.jpg

खळबळजनक  गडचिरोली जिल्ह्यातील           टीटोळाच्या पाटलाची नक्षल्यांकडून हत्या,
तिन ते चार नागरिकांचे अपहरण,

एटापल्ली /गडचिरोली -युवा मराठा न्यूज नेटवर्क 
तालुक्यातील टीटोळा गावचे पाटील लालसु वेळदा (वय 60 वर्ष) यांची नक्षल्यांनी हत्या करून गावातील दहा ते बारा नागरिकांचे अपहरण केल्याने तालुक्यात दहशत परसली आहे.
(ता.२३ गुरुवार) रात्री नऊ वाजताच्या दरम्यान दोनशे पेक्षा जास्त संख्येने टीटोळा गावात आलेल्या नक्षल्यांनी गावाला घेराव घालून पाटील लालसू वेळदा यांची दगडाने ठेचून हत्या केली व दहा ते बारा गावकरी नागरिकांचे अपहरण करण्यात आले, सदरची घटना वादग्रस्त सुरजागड लोहखनिज उत्खनन कामात लालसू वेळदासह इतर गावकरी मदत करीत असल्याचा संशयातून नक्षल्यांनी लालसू वेळदा यांची हत्या करून नागरिकांचे अपहरण केल्याचे बोलल्या जात आहे, घटनेची तक्रार हेडरी पोलिसांनी करण्यात आली आहे.