आशाताई बच्छाव
बिग बजेट’शासन आपल्या दारी ‘ स्थगीत; लवकरच नवीन तारीख, प्रशासनाची माहिती.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती. शासन आपल्या दारी चा२६ नोव्हेंबरला जिल्ह्यात धडाका. त्या अनुषंगाने सर्व शासकीय विभाग कामाला लागल्या असताना २६ला येथील सायन्स स्कोर मैदानावर आयोजित हा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. लवकरच नवीन तारीख येणार असल्याची तयारी सुरूच आहे. मात्र वेग मंदावण्याचे दिसून येत आहे. विभागाच्या मुख्यालय असलेले’शासन आपल्या दारी’अभियानासाठी किमान पाच कोटीचा खर्च अपेक्षित होता. यासाठी डीपीसी मधून तरतुद करण्याचा सूचना यापूर्वी शासनाने दिले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांनी प्रत्येकी २० लाखाचा निधी उपलब्ध करावा, यासाठी जिल्हा प्रशासन द्वारे पत्र देखील देण्यात आलेले आहे. या अभियानाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहत असल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयाने जयत तयारी केली होती. त्या उत्साहावर आता विरजन पडले आहे. या कार्यक्रमासाठी काही निविदा काढण्यात आल्या व या कंत्राटदारांनी तयारी देखील सुरू केली होती. कार्यक्रम स्थगित झाल्याने ही कामे देखील थांबली आहे. डिसेंबर महिन्यात हा कार्यक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






