Home जळगाव विवाहितेला ५० हजारांसाठी मारहाण करत छळ ; जळगाव तालुका पोलिस स्टेशन मध्ये...

विवाहितेला ५० हजारांसाठी मारहाण करत छळ ; जळगाव तालुका पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल!

176

आशाताई बच्छाव

IMG_20231121_062400.jpg

विवाहितेला ५० हजारांसाठी मारहाण करत छळ ;
जळगाव तालुका पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल!

योगेश पाटील, जळगाव.

कानळदा येथील माहेर असलेल्या विवाहितेला दुचाकी घेण्यासाठी माहेरुन ५० हजार रुपये आणावे यासाठी मारहाण करत छळ केल्याच प्रकार गुरूवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास समोर आला आहेत.
याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील कानळदा येथील माहेर असलेल्या रत्नाबाई मुकेश कोळी (वय-३२) यांचा
विवाह चोपडा तालुक्यातील सुटकार येथील मुकेश कोळी यांच्याशी रिती रिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे १५ दिवस चांगले गेले त्यानंतर विवाहितेला माहेराहून दुचाकी घेण्यासाठी ५० हजार रूपयांची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही याचा राग मनात धरून विवाहितेला शिवीगाळ करत “पैसे आणले नाही तर तू कशी नांदते आम्ही बघतोच” अशी धमकी देत मारहाण केली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानळदा येथील माहेर असलेल्या रत्नाबाई यांचा विवाह चोपडा तालुक्यातील सुटकार येथील मुकेश कोळी यांच्याशी झाला.लग्नानंतर १५ दिवसांनी विवाहितेकडे पैशाची मागणी करीत तिचा छळ केला जाऊ लागला. वारंवार शिवीगाळ करीत मारहाण होत असल्याने विवाहिता माहेरी निघून आली.
याप्रकरणी विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती मुकेश कोळी, सासरे दगा कोळी, सासू चंद्रभागा कोळी, मावस सासरे जगन सोनवणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous articleआमदार मंगेशदादा चव्हाण ५ दिवसांच्या लंडन येथील अभ्यास दौऱ्यासाठी रवाना…
Next articleकुणबी प्रमाणपत्राची कार्यपद्धती निश्चित करणारे समिती आज अमरावती: न्या. संदीप शिंदे यांच्यासह इतर सदस्य येणार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.