Home गडचिरोली _सिंचनासाठी पाण्याचा योग्य वापर करून उत्पादन घ्या_..

_सिंचनासाठी पाण्याचा योग्य वापर करून उत्पादन घ्या_..

194

आशाताई बच्छाव

IMG_20231120_175737.jpg

_सिंचनासाठी पाण्याचा योग्य वापर करून उत्पादन घ्या_..

उसेगाव ता.जि.गडचिरोली येथील बंधाऱ्याच्या पाहणीदरम्यान खासदार अशोक नेते यांचे आवाहन_

गडचिरोली,(सुरज गुंडमवार): नदीनाल्यांचा व पाण्याचा जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. तरीही उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणी समस्या निर्माण होते. मात्र, उसेगाव येथील नागरिकांनी पुढाकार घेऊन कठानी नदीवर श्रमदानातून बंधारा बांधला, त्या बंधाऱ्यांतील पाण्याचा शेतीसाठी योग्य वापर करून उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.
तालुक्यांतर्गत येणाऱ्या उसेगाव येथील नागरिकांनी कठानी नदीवर श्रमदानातून बंधारा बांधला. यामुळे उसेगाव परिसरात कठानी नदी दुथडी भरून आहे. या बंधाऱ्यांची पाहणी करण्यासाठी खासदार अशोक नेते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, समय्या पसुला रविवार, १९ नोव्हेंबरला सायंकाळी उसेगाव येथे भेट दिली. यावेळी ते उपस्थित शेतकऱ्यांशी बोलत होते.
जिल्ह्यातील नदीनाल्यांवर यासारखे बंधारे बांधल्यास उन्हाळ्यातही जिल्हात पाणी समस्या निर्माण होणार नाही, यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. केवळ उपक्रम म्हणून बंधारे बांधून फायदा नाही तर त्या बंधाऱ्यांतील पाण्याचा वापर करून विविध उत्पादन पिके शेतकऱ्यांनी घ्यावे. असे याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी आवाहन केले.

Previous articleतोडगट्टा आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखले
Next articleतळेगावच्या विधवा, निराधार महिलेला मिळाला हक्काचा निवारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.