Home जळगाव रेल्वे लाईनच्या कामावरून साडे चार लाखांच्या लोखंडी प्लेटा व आसरींची परस्पर विक्री

रेल्वे लाईनच्या कामावरून साडे चार लाखांच्या लोखंडी प्लेटा व आसरींची परस्पर विक्री

167

आशाताई बच्छाव

IMG_20231119_064822.jpg

रेल्वे लाईनच्या कामावरून साडे चार लाखांच्या लोखंडी प्लेटा व आसरींची परस्पर विक्री

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- जळगाव ते हिरापूर दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू असून यासाठी लागणाऱ्या 44 लोखंडी प्लेटा व 2 टन आसारी असे सुमारे 4 लाख 54 हजार 740 रूपयांचे साहीत्य कामावरील सुपरवायझरने कोणाला तरी विकल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी साईट सुपरवायझरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव ते हिरापूर दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू असून बीएनए इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. भुसावळ या कंपनीने हे काम घेतले आहे. साईट सुपरवायझर नितीन भारती रा. हिसवळ ता. नांदगाव जि. नाशिक याने 3 लाख 44 हजार 740 रूपये किंमतीच्या 44 लोखंडी प्लेटा व 1 लाख 10 हजार रूपये किंमतीच्या 2 टन आसारी असा सुमारे 4 लाख 54 हजार 740 रूपये किंमतीचे साहित्य
दि.6/10/2023 ते 9/11/2023 या दरम्यान कंपनीचा विश्वासघात करून परस्पर कोणाला विकून अपहार केला. याप्रकरणी सुपरवायझर अजय रविंद्र चौधरी, जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारती याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भादंवि कलम 408 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अहे.

Previous articleकजवाडे येथे रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
Next articleरोहीणी येथे अडीच लाखांचा ऐवज लंपास
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.