आशाताई बच्छाव
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे खासगी सचिव बालाजीराव खतगावकर साहेब देगलूर येथे आले असता देगलुरच्या विविध तक्रारी बाबतीत बोलुन, त्यांचा सत्कार करतेवेळी देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी मनोहरराव जोशी.
देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे खासगी सचिव बालाजीराव खतगावकर साहेब देगलूर येथे आले असता त्यांची भेट घेऊन आतापर्यंत मी केलेल्या अनेक तक्रारीच्या विकासकाम बदल केलेल्या पाठपुराव्या बाबतीत पत्र दाखवुन ते काम लवकर सोडविण्यासाठी साहेबांनकडे विनंती केली……
1) देगलूर शहरातील पशुवैद्यकीय दवाखानाच्या विकासासाठी पाच कोटी मंजूर होऊन कामाला अजुन सुरवात झाली नसुन लवकरात लवकर काम चालू करण्यात यावे यासाठी विनंती केली तसेच
2) देगलूर बसस्थानकात नवीन विस पंचवीस नवीन बसेल उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली
3) देगलूर शहराच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली
4) शासकीय समिती मध्ये शिंदे गटाच्या पदाधिकारी यांना स्थान देण्यात यावे
5) देगलूर शहरात शिंदे गटाचे आमदार खासदार नसुन पदाधिकारी यांना देगलूर शहरात विकास करण्यासाठी प्रत्येक प्रभागात निधी उपलब्ध करून देण्याबाबत,
6) देगलूर बसस्थानकाचे नवीन टेंडर निघाले असुन गुत्तेदाराला लवकर कामाला सुरुवात करण्याचे आदेश देण्याबाबत
7) देगलूर हा उपजिल्हा असल्यामुळे देगलूर येथे शासकीय महाविद्यालय स्थापन करण्यात यावे
7) देगलूर शहराला बाह्य वळण रस्ता करण्यात यावा
8) देगलूर शहराला नवीन रोजगार मिळवून देण्यासाठी
9) नांदेड देगलूर बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा
10) देगलूर महावितरण कंपनीच्या गैरकारभार विषयावर
11) उपजिल्हा रुग्णालयातील सोई सुविधा बाबत
अश्या अनेक विविध तक्रारी बाबतीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे खासगी सचिव बालाजीराव खतगावकर साहेब यांना बोलुन, त्यांचा सत्कार करतेवेळी देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी मनोहरराव जोशी यावेळी सोबत माजी सनदी अधिकारी मधुजी गिरगावकर साहेब, कोंडेकर साहेब, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस दिगंबर कौरवार, ओबीसी संघर्ष समिती अध्यक्ष गंगाधर भांगे, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत दासरवार, युवा जिल्हा उपाध्यक्ष माधव पाटील पाळेकर साहेब, देगलूर नगर परिषदेचे मा लेखापाल व्यंकटराव कांबळे, देगलूर नगर परिषदेचे कर्मचारी लालु सोनकांबळे साहेब,क्षिरसमुद्र ग्रामपंचायत अध्यक्ष आंनद राजुरे साहेब,क्रांग्रेस सोशल मीडिया जिल्हा सचिव रुपये पाटील भोखसखेडकर यांच्या समवेत अनेक जणं उपस्थित होते






