Home उतर महाराष्ट्र कजवाडे येथे रंगला भाजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

कजवाडे येथे रंगला भाजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

173

आशाताई बच्छाव

IMG_20231118_174419.jpg

म्हसदी ,(प्रतिनिधी श्रीहरी बोरसे )-  कजवाडे-येथे 2011-12 ची दहावीची बॅच पुन्हा एकत्र आली. 2011 व 12 या वर्षी कजवाडे येथील आदर्श माध्यमिक विद्यालय येथे शिक्षण घेत असलेले दहावीची बॅच दिनांक 16 11 2023 गुरुवार रोजी गेट टू गेदर कार्यक्रमाचे आयोजन करून पुन्हा एकत्र आले.त्यात सर्वांनी आपल्या दहावीनंतरच्या जीवनावर ज्या घडामोडी घडल्या त्या व जे सुख दुःख आले ते मनमोकळ्यापणाने एकमेकांत व्यक्त केले व मागचे दिवसांच्या आठवणीना पुन्हा एकदा उजाळा दिला.
दहावीच्या बॅच चे क्लास टीचर कै. कासार सर यांची काल पुण्यतिथी असल्यामुळे सर्व मित्रांनी व मैत्रिणींनी सरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. यावेळी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.या वेळी श्रीहरी बोरसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.व केतन कदम, शुभम जाधव, ज्ञानेश्वर बच्छाव, योगेश शिरसाठ, रुपेश बोरसे, दिगंबर बच्छाव, समाधान शिंदे, तुकाराम गोयकर, नरेंद्र पवार, पूजा मोहिते, चंद्रमा माहिते, अरुणा सोनवणे, कीर्ती सोनवणे, अर्चना सूर्यवंशी, शितल भामरे, इत्यादी सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी योगेश शिरसाठ यांनी सर्वांचे आभार मानले